ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या हस्ते गौरव झालेली 'ती' राहतेय फुटपाथवर; उमलत्या फुटबॉलपटुची संघर्षगाथा

मेरी तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडिलांसह मुंबईतल्या किंग सर्कल फुटपाथवर राहते. हेच तिचे घर आहे. देशाची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरीला रहायला पक्के आणि कायमस्वरुपी घर देखील नाही.

फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहणारी मेरी नायडू परिस्थीतीशी संघर्ष करत आहे.
author img

By

Published : Mar 20, 2019, 11:31 AM IST

मुंबई - प्रतिभा ही कोणा विशिष्ट वर्गाची जहागिरी नाहीत. ही गोष्ट वेळोवेळी समाजात दिसून येते. याचेच प्रत्यंतर मुंबईतील मेरी नायडू या युवा फुटबॉलपटुला भेटल्यानंतर येते. अवघ्या सतरा वर्षे वयात मेरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिच्या कुटुंबाची गरिबी तिच्या कर्तृत्वाच्या आड आली नाही. पण, शासन आणि प्रशासन या गुणी खेळाडूबद्दल अनास्था दाखवत आहे. त्यामुळे फुटबॉलचे मैदान सोडून तिला कुटुंबासोबत जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते गौरव -
मेरी नायडू ही सतरा वर्षीय मुलगी. धारावीतल्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमधल्या या विद्यार्थीनीने अल्पावधीतच फुटबॉलमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तालुका, जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने फुटबॉलमध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. फुटबॉलची प्रतिमा देऊन पंतप्रधान मोदींनी तिचा सन्मान केला. यामुळे मेरीसह तिचे कुटुंबीय हरखून गेले. मेरीला खेळण्याची उर्मी मिळाली.

पंतप्रधानांच्या सत्कारामुळे मेरी काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रात प्रकाशझोतात आली. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर केला. तिच्या खेळात मदत करण्याची आश्वासने दिली गेली. पण, हा बहर ओसरला आणि सगळी आश्वासने हवेत विरली. मनात महत्वकांक्षेचा अंकुर तर बहरला. मात्र, परिस्थितीचा विळखा अजूनही सुटत नाही. अशा परिस्थितीत आपली महत्वकांक्षा, स्वप्न कसे पूर्ण करायचे याची भ्रांत मेरीला पडली आहे. तिच्या पालकांना देखील मुलीची प्रतिभा अशीच विझून जाऊ नये याची चिंता आहे.

हालाकीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सुटले
मेरी तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडिलांसह मुंबईतल्या किंग सर्कल फुटपाथवर राहते. हेच तिचे घर आहे. देशाची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरीला रहायला पक्के आणि कायमस्वरुपी घर देखील नाही. महापालिकेच्या अतिक्रमणाचा हातोडा कधी पडेल याचा काही नेम नाही. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चारदा अतिक्रमणविरोधी कारवाई झाली आहे. यात त्यांना आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करावे लागले. मेरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे, हे कदाचित पालिका कर्मचाऱ्यांच्या गावीही नसेल. मेरीचे वडील महापालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार आहेत. त्यांच्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे अशक्य आहे. त्यामुळे मेरी आणि तिच्या बहिणींचा शिक्षणाचा भार उचलणे ही तर अशक्यप्राय गोष्ट. त्यामुळे शाळेनंतर मेरीला शिक्षण थांबवावे लागले.

मेरीच्या दोन लहान बहिणी देखील खेळाडू आहेत. आपल्या तिन्ही मुलींनी खेळाडू व्हावे, देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. पण, एका मुलीचेचे भवितव्य अंधारात असताना बाकीच्या मुलींचे काय होईल, ही भीती त्यांना सतावत आहे. मेरीने मिळवलेली पदके, प्रमाणपत्रे यांचा तिच्या कुटुंबीयांना अभिमान आहे. पण, ही सर्व पदके आता धूळ खात पडली आहेत. मेरीच्या उमलत्या प्रतिभेला शासन प्रतिसाद देणार का हे पाहणे आता महत्वाचे आहे.

Intro:विशेष बातमी

अँकर :- मुंबईतल्या किंग सर्कल फुटपाथवर राहुल कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटू मेरी नायडूला सध्या संघर्ष आणि परिस्थिती अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतोय. परिस्थितीवर मात करून मेरी नायडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली मात्र सध्या निर्माण झालेल्या आर्थिक अडचण आणि बेघर झालेली आहे. आयुष्यात असलेल्या या संकटनमुळे ती निराश झाली आहे. दीड वर्षापूर्वी मेरी नायडू पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला .त्यानंतर ती किंग सर्कल फुटपाथवर झोपडपट्टीत राहत असल्याने तिला मदतीचे आवाहन करण्यासाठी अनेक नेत्यांनी हात पुढे केले होते. मात्र दीड वर्षांनंतर देखील तिला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने मात्र तिचे कुटुंब सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे.

विवो :- मेरी प्रकाश नायडू वय वर्ष 17 पण या कमी वयातच फुटबॉल खेळात तिने खूप सारं काही यश मिळवले .धारावीतल्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मध्ये मेरी दहावीपर्यंत शिकली. या काळावधी ने तिने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर मजवर 2017 साली मेरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात संकटांचे जणू वादळच आलंय. राहत असलेलं घर हे बेकायदेशीर असल्याने वारंवार महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करते, बेटी पढाव बेटी बचाव असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या देशात सध्या एक मुलगी ताकतीच्या जोरावर सगळ्या गोष्टींचा सामना करतेय.

बाईट :- मेरी नायडू

विवो :- मेरी ने केलेल्या कामगार कामगिरीनंतर तिच्या मदतीसाठी व कौतुकांचे शाबासकीचे अनेक हात पुढे सरसावले. वडील महानगरपालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतात तुटपुंज्या पगारावर घर चालवावे लागत असल्यामुळे तीन मुली आणि घरचा खर्च उचलण्यात अनेक अडचणी येत असल्याचे तिचे आई वडील सांगतात. मेरी सारखंच दोन्ही बहिणींना ही खेळामध्ये खूप आवड आहे आणि त्यातील एक बहीण फुटबॉल तर दुसरी बहीण बॅडमिंटन खेळते परंतु एकीच स्वप्न पुर्ण झालं नाही. तर दोघींचं कसं होणार याची तिच्या आईला मोठी खंत वाटते. मेरीने आतापर्यंत मिळवलेली अनेक प्रमाणपत्र गळ्यातील कमावलेली मेडल सध्या झोप झोपडीत धूळखात पडलेले आहेत. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चार वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीच्या आयुष्यात संकटाची कमी होत नाही असे दिसते आश्वासने फक्त आश्वासने राहिली असून आम्हाला या दीड वर्षात कोणी विचारलं नसल्याची खंत मेरीच्या बाबांनी व्यक्त केली

बाईट :- मेरीची बाबांची वाईट

विवो :- फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या मेरीला सध्या मदतीची आवश्यकता आहे. आर्थिक अडचण आणि घरावर वारंवार अतिक्रमण होणारे त्यामुळे तिने शिक्षण सध्या थांबवलेले आहे. यंदा अकरावीत ऍडमिशन घेतल्यानंतर मेरी वर्षभरात कॉलेजलाच गेली नाही देशात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला परंतु यासारख्या महिलांचे मुलीचे स्वप्न अर्ध्यावर राहिले आहे याकडे सरकारने आणि समाजाने मोठ्या बारक्या नजरेने पाहिलं पाहिजे मेरी सारख्या मुलीला मदतीचा हात पुढे दिला पाहिजे.तरचं तिने पाहिलेलं देशासाठी खेळण्याच स्वप्नं पूर्ण होईल.

(अल्पेश करकरे, ईटीव्ही भारत,मुंबई.) कृपया बायलाईन द्यावी सर/मॅडम

या बातमीसाठी मोदीनी जो गौरव केला ते व्हिज्युअल व्हाट्सएपच्या केलेत कृपया त्याचाही वापर करावा

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.