ETV Bharat / state

संजय छाब्रियाला दिलासा नाहीच; जामीन याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली - Yes Bank Scam Case

Yes Bank DHFL Scam Case : बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया हा येस बँक आणि डीएचएफएल कर्ज फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी संजय छाब्रिया अजूनही कोठडीतच आहे. परंतु कोठडीतून सुटका व्हावी यासाठी त्यानं मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं 21 डिसेंबरला फेटाळून लावलीय.

sanjay chhabria bail plea rejected by mumbai high court
संजय छाब्रियाला दिलासा नाहीच; जामीन याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 7:19 AM IST

Updated : Dec 22, 2023, 9:36 AM IST

मुंबई Yes Bank DHFL Scam Case : येस बँक आणि डीएचएफएलमधील बेकायदेशीर कर्ज प्रकरणांमध्ये येस बँकेचे संस्थापक राणा कपूरसह संजय छाब्रिया याला 28 एप्रिल 2022 रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. परंतु त्यानंतर जून 2022 मध्ये संजय छाब्रियाची कोठडी ईडीनं घेतली. त्यामुळं संजय छाब्रिया यानं 'औपचारिक अटक झालेलीच नाही, तर कोठडीतून सुटका मिळावी.' या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पी. के. चव्हाण यांच्या एकल पीठासमोर याचिका दाखल केली होती. मात्र, याचिका दाखल करण्यास फार विलंब झालाय आणि नियमांनुसार सुटकेचा आदेश देता येत नाही, असं म्हणत उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे.

काय म्हणाले आरोपीचे वकील : आरोपीचे वकील वैभव कृष्णा म्हणाले की, "अगोदर सीबीआयच्या कोठडीमध्ये आरोपी होता. नंतर जून 2022 मध्ये ईडीनं कोठडी घेतली. त्यामुळंच कोठडीतून सुटका व्हावी, यासाठी आरोपीकडून याचिका करण्यात आलीय. विशेष न्यायालयानं कोठडी सुनावताना संवैधानिक उपायांचं पालन न करताच आरोपीची कोठडी मंजूर केली. तसंच औपचारिकरित्या आरोपीला अटक झालीच नाही. शिवाय अटक करण्याचे कारण देखील ठोसपणे समोर येत नाही. त्यामुळेच कोठडीतून त्याची सुटका झाली पाहिजे."

ईडीच्या वकिलांचा जोरदार विरोध : अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीनं वकील हितेंद्र वेणेगावकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. ते म्हणाले की, "डीएचएफएल बँक फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी संजय छाब्रिया याच्याकडून कोठडीतून सुटका करण्यासाठी बराच उशीर झालेला आहे. त्यामुळं आता त्याला जामीन मिळू शकत नाही".

न्यायालयानं फेटाळली याचिका : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी के चव्हाण यांनी निर्णयात नमूद केलं की, "आरोपीकडून याचिका दाखल करण्यास उशीर झालाय म्हणून माफी दिली जाऊ शकत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच ही याचिका फेटाळली जात आहे", असं न्यायालयानं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Money Laundering Case सुधाकर शेट्टी सीबीआयच्या रडारावर; अटकेची टांगती तलवार कायम
  2. Yes Bank DHFL Fraud : येस-बँक डीएचएफएल फसवणूक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; एकूण 415 कोटींची मालमत्ता जप्त.
  3. रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Last Updated : Dec 22, 2023, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.