ETV Bharat / state

Look Back 2022 : सरत्या वर्षात 'या' दिग्गजांची एक्झिट मनाला चटका लावून गेली

2022 हे वर्ष विविध कारणांनी गाजले. रशियाचा युक्रेनवरील हल्ला, ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड तसेच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे सत्तांतर ह्या घटना वर्षभर चर्चेत राहिल्या. तसेच या वर्षात महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आपल्याला कायमच्या सोडून गेल्या. (famous Maharashtrian died in year 2022). 2022 चे पुनरावलोकन करताना अशाच काही व्यक्तींबद्दल जाणून घ्या संक्षिप्तपणे.. (Year Ender 2022) Look Back 2022

author img

By

Published : Dec 18, 2022, 5:36 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:26 PM IST

Year Ender 2022
Year Ender 2022

मुंबई : गेल्या वर्षभरात लता मंगेशकर, रमेश देव, विनायक मेटे अशा अनेक मान्यवरांचे निधन झाले. (famous Maharashtrian died in year 2022). या व्यक्तींची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. जाणून घ्या 2022 मध्ये महाराष्ट्रातील कोणकोणते प्रसिद्ध व्यक्ती हे जग सोडून गेले. (Year Ender 2022).

  • रमेश देव - प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे 2 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. देव यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पत्नी सीमा देव आणि मुलगा अजिंक्य देव हे देखील प्रसिद्ध चित्रपट कलाकार आहेत.
रमेश देव
रमेश देव
  • लता मंगेशकर - 6 फेब्रुवारी 2022 रोजी गानकोळीळा लता मंगेशकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला गेला. लतादीदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 1987 मध्ये भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला होता. तर 2001 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकूण तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाले आहेत.
लता मंगेशकर
लता मंगेशकर
  • तरला जोशी - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तरला जोशी यांचे 6 जून 2021 रोजी निधन झाले. जोशी यांनी साराभाई vs साराभाई, एक हजारो में मेरी बहना हैं यासारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
तरला जोशी
तरला जोशी
  • प्रदीप पटवर्धन - 9 ऑगस्ट 2022 रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मोरुची मावशी' या मराठी नाटकातील भूमिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. एक फुल चार हाफ (1991), जमलं हो जमलं (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.
प्रदीप पटवर्धन
प्रदीप पटवर्धन
  • विनायक मेटे - शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि राजकारणी विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई पुणे दृतगतीमार्गावर वयाच्या ५२ व्या वर्षी अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. तसेच ते सलग पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये मेटे यांचे मोठे योगदान होते. तसेच मुस्लिम सामाजालाही आरक्षण मिळावे यासाठी ते आग्रही होते.
विनायक मेटे
विनायक मेटे
  • सायरस मिस्त्री - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे 4 सप्टेंबर 2022 रोजी अहमदाबादहून मुंबईला जात असताना एका भीषण कार अपघातात निधन झाले. ते 54 वर्षाचे होते. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री 2012 ते ऑक्टोबर 2016 दरम्यान 'टाटा सन्स' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते.
सायरस मिस्त्री
सायरस मिस्त्री
  • संजीव साने - 28 ऑक्टोबर 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी संजीव साने यांचे ठाण्यात निधन झाले. ते स्वराज अभियानाच्या महाराष्ट्र युनिटचे उपाध्यक्ष होते. साने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार होते.
संजीव साने

Last Updated : Dec 22, 2022, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.