मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण आणि एल्गार परिषद या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. या दोन्हीचा काहीही संबंधी नाही. या प्रकरणामध्ये ज्यांचा काडीचाही संबंधी नाही जे तिथं उपस्थितही नव्हते, अशांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांची चौकशी केली, यात पोलिसांची भूमीका शंकास्पद असल्याचे मला वाटत आहे त्यामुळे पोलिसांचीच चौकशी करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. मुंबई येथे त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेत कोरेगाव भीमा प्रकरणावर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले.
कोरेगाव भीमात हिंसाचाराआधी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी वातावरण निर्मिती केल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आज केला. एल्गार परिषद, भीमा कोरेगाव यांचा संबंध नाही. तर, एल्गार परिषदेत शंभरहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. उपस्थित नसलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याची टीकाही पवारांनी केली.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- केंद्र सरकार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी आताच एवढी तत्परता का दाखवली.
- एल्गार परिषदेमध्ये सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळ यांची कविता सादर केली होती.
- एल्गार परिषदेमध्ये सहभागी नसलेल्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत.
- एल्गार परिषदेमध्ये शपथ घेण्यात आली होती. त्या शपथेचा संपूर्ण अहवाल पोलीसांनी सादर केलेला होता. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी यांनी याबद्दल माहिती सादर केली.
- शपथेमध्ये संविधान वाचवण्याचा उल्लेख करुन आरएसएसला विरोध दर्शवला होता.
- पोलिसांनी या प्रकरणामध्ये आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यांची कसून चौकशी व्हायला हवी.
- केंद्र सरकारला एनआयएकडे तपास देण्याचा अधिकार आहे, हे मान्य आहे. मात्र, राज्य सरकारला विचारात घेणे गरजेचे आहे.
- एल्गार परिषदेमध्ये पोलीस दलाने सत्तेचा गैरवापर केला, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी माझी मागणी आहे.
- ज्यांचा कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये संबंध नाही अशांवर झालेल्या कारवाईचा तपास करण्याचा अधिकार कायद्यानुसार राज्य सरकारला आहे.
- पोलीस तपासामध्ये पुणे पोलिसांनी केलेला तपास चिंताजनक आहे.
- महाराष्ट्र पोलीस दलाचा मला अभिमान आहे.
- कोरेगाव भीमा ज्या जिल्ह्यात येतो मी तिथला असल्याने मला त्याबद्दल इतरांपेक्षा जास्त माहिती आहे.
- तुरुंगात असणाऱ्यांची चौकशी केली तर त्यांच्याकडून या प्रकरणाबद्दल अजून माहिती मिळेल.
- कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणामध्ये संभाजी भिडेंनी वेगळं वातावरण तयार केलं.
- फडणवीसांना वाटत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्यात.
- प्रधानमंत्र्यांच्या हत्येचा कटाची बातमी हे हास्यास्पद प्रकरण आहे. याबद्दल काहीही पुरावे सापडलेले नाहीत. ज्यांच्याकडे असे पुरावे आहेत त्यांनी सादर करायला हवेत.
- एनपीआरच्या विरोधात आम्ही संसदेमध्ये मतदान केले आहे. ही आमच्या पक्षाची भूमीका आहे. मात्र, राज्यामध्ये आमच्या आघाडीने अजून तसे काही ठरवलेले नाहीत. त्यावर चर्चा चालू आहे.
- महाविकास आघाडीमध्ये आलबेल चालू आहे. कोणीही काळजी करू नये.
- उद्धव ठाकरेंची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
- राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घ्यावा असे माझे मत आहे. याबाबत पक्षांचे अध्यक्ष बसून निर्णय घेतील.
- तुषार गांधींच्या भाषणाला विरोध करण्यात आला, यामध्ये शैक्षणीक संस्थामध्ये काही शक्ती काम करत आहेत. भाषण रद्द करायचं असेल तर त्यांना महाविद्यालय प्रशासनाने बोलावलेच का होते?