ETV Bharat / state

जागतिक परिचारिका दिन '12 मे' दिवशीच का साजरा होतो, जाणून घ्या..

author img

By

Published : May 12, 2020, 9:27 PM IST

आज 12 मे, आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी 1853 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांची सुश्रुषा करुन मृत्युदर आश्चर्यकारकरित्या कमी केला होता. 12 मे, 1820 हा त्यांचा जन्मदिन. त्यामुळे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

nursing day
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - आज 12 मे, आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी 1853 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांची सुश्रुषा करुन मृत्युदर आश्चर्यकारकरित्या कमी केला होता. 12 मे, 1820 हा त्यांचा जन्मदिन. त्यामुळे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म ब्रिटनच्या एका गर्भश्रीमंत कुटुंबात झाला होता. जेव्हा नाईंटिंगेल यांनी वडिलांकडे आपल्याला परिचारिकेचे शिक्षण घेण्याची ईच्छा व्यक्त केली, त्यांच्या कुटुंबियांना हे आवडले नाही. मात्र तरीही त्यांनी परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले. 1850 साली फ्लोरेन्स नाइटिंगेल या लंडन शहरातील रूग्णालयात कार्यरत होत्या. त्याच दरम्यान कॉलराची साथ पसरली. कॉलेरात होणारे मृत्यु हे मोठ्या प्रमाणात असलेल्या अस्वच्छतेमुळे होत असल्याचे फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या लक्षात आले. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थितीची हाताळली केली.

त्यानंतर 1853 साली झालेल्या क्रिमियन युद्धात 18 हजारांपेक्षा जास्त सैनिक जखमी झाले होते. त्यांचा उपचारही त्यांनी एका सैनिकाप्रमाणे केले. त्या अहोरात्र कंदील घेऊन सैनिकांचा उपचार करत होत्या. यामुळे त्यांना 'लॅम्प वूमन', असेही संबोधले जाऊ लागले. युद्धात झालेल्या अनेकांचा मृत्यू हा जखमेने नाही तर जखमेवरील अस्वच्छतेने होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी उपचारासह रुग्णांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देऊ लागल्या. त्यामुळे मृत्यूदर खालावले. त्यानंतर त्यांनी परिचारिकांसाठी नर्सेस नोट तयार केल्या. पुढे त्यांनी हायजिन थेअरीची मांडणी केली. आज हीच थेअरी ही नर्सिंगचा पाया मानली जाते.

अनेकांचे मृत्यू पुरेशी स्वच्छता नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरीत स्वच्छतेला रुग्णसेवेत अधिक महत्व दिले. त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल डेटा तयार केला. तसचे परिचारिकांसाठी नर्सेस नोट तयार केल्या. पुढे त्यांनी हायजिन थेअरी मांडली. ही थेअरी म्हणजे मॉर्डन नर्सिंगचा पाया मानली जाते. जीवनभर रुग्णसेवा केल्यानंतर त्यांचा 12 ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - नर्सेसला सलाम..! कोरोनाविरोधाच्या युद्धातील 'फ्रंट वॉरियर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.