ETV Bharat / state

Breaking News : उद्धव ठाकरे गट गॅस दर वाढ विरोधात रस्त्यावर, तर मेळाव्यात मार्गदर्शन - राजकारण ब्रेकिंग न्यूज

WORLD INDIA MAHARASHTRA CRIME POLITICS BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.. एकाच क्लिकवर
author img

By

Published : Mar 1, 2023, 7:22 AM IST

Updated : Mar 1, 2023, 9:36 PM IST

21:33 March 01

उद्धव ठाकरे गट गॅस दर वाढ विरोधात रस्त्यावर, तर मेळाव्यात मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - गॅस दर वाढल्यामुळे सर्व सामान्यांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाने तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन केले. पूर्वी दोन रुपयांनी इंधन दर वाढ झाली तरी देशात आंदोलन होत होते. मात्र आता कोणीही बोलायला तयार नाही. मात्र आम्ही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिला. आंदोलन करण्याआधी शहरात शिवगर्जना मेळावा घेण्यात आला.

19:55 March 01

मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन मित्रांचा जागीच चिरडून मृत्यू

ठाणे : मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावरून दोघे मित्र दुचाकीवरून भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर घडली आहे. सूरज सुनिल कुंचिकोरवे (२६) आणि मुत्तू लक्ष्मण मुरघन तेवर (२६ दोघे रा.धारावी, मुंबई) अशी अपघातात मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.

19:49 March 01

सिसोदिया, जैन भाजपत गेले तर सगळे खटले मागे घेतले जातील - केजरीवाल यांचा टोला

नवी दिल्ली - मनीष सिसोदिया आज भाजपमध्ये दाखल झाले तर उद्या त्यांची सुटका होणार नाही का?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले जातील. तसेच सत्येंद्र जैन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले जातील आणि उद्या त्यांची तुरुंगातून सुटका होईल, असाही दावा त्यांनी केला. खरे तर मुद्दा भ्रष्टाचाराचा नाही तर काम थांबवण्याचा आणि विरोधानंतर सीबीआय-ईडी पाठवण्याचा आहे, असाही टोला केजरीवाल यांनी लगावला.

19:37 March 01

सरकारने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावे, अन्यथा कोयनेची वीज बंद करू - उदयनराजेंचा इशारा

सातारा - खा. उदयनराजे भोसले यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. साठ वर्षे होऊन गेली तरी कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करणार आहे, असे भोसले यांनी सांगितले. तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा कोयनेची वीज बंद करू, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

19:30 March 01

ऑनलाईन साडी खरेदी करणे पडले महागात, महिलेला 47 हजारांचा गंडा

मुंबई : लालबागमधील एका २८ वर्षीय महिलेने ऑनलाईन साडी खरेदी केली. मात्र, वेगळीच साडी पाठवल्याने आवडली नाही म्हणून तिला परत करायची होती. त्यावेळी साडी बदलून मिळण्यासाठी महिलेकडे कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्या मोबाईलवरून आलेल्या लिंकवर क्लिक करून तक्रारदार महिलेने माहिती भरली. या माहितीत तिने युपीआय पिन क्रमांक देखील दिला. त्यानंतर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून ४७ हजार ५७६ रुपये काढून घेतले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19:06 March 01

अल्पवयीन मुलींना मारहाण करणाऱ्या मद्यपी महिलेला अटक

ठाणे - पोलिसांनी एका 33 वर्षीय महिलेला दारूच्या नशेत तिच्या दोन अल्पवयीन मुलींना बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. मीरा भाईंदर-वसई विरार (MBVV) पोलिसांनी ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणाऱ्या तिच्या पतीने याबाबतची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर महिलेवर कारवाई करण्यात आली.

19:00 March 01

हायकोर्टाचे निकाल आता पाहा मराठीत, वेबसाईटवर निकाल अपलोड करण्यास सुरुवात

मुंबई - उच्च न्यायालयाने आजपासून आपले निकाल मराठी भाषेत वेबसाइटवर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. मराठीत अनुवादित केलेले निकाल तपासण्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे.

18:55 March 01

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाची नोटीस

मुंबई - विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या आमदारांना देशद्रोही म्हणून संबोधित केल्याबद्दल विशेषाधिकार भंगाची नोटीस सादर केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही नोटीस परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या कार्यालयात सादर केली. त्यांनी ही नोटीस स्वीकारली आहे. तसेच पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे त्यांनी ही नोटीस सोपवली आहे.

18:47 March 01

कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्टमधील अनियमिततेसाठी एसआयटी नेमा - सोमैया

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महामारीच्या काळात कोविड केंद्रांसाठी कंत्राट देण्यात आलेल्या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) मागणी केली. सोमैया यांनी आपल्या घरी पत्रकार परिषदेला संबोधित करताना लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी संबंधित १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा केला. फर्मचे सहकारी सुजीत पाटकर हे शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत, असे त्यांनी सांगितले.

18:34 March 01

एल्गार प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग स्वतःच करणार जामीन अर्जावर युक्तिवाद

मुंबई - एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात अटकेत आसलेल्या सुरेंद्र गडलिंग यांनी बुधवारी स्वतःच्या जामीन अर्जावर स्वतःच युक्तिवाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची विनंती केली आहे. गडलिंग हे वकील असल्याने आपल्याला कोर्टात स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळावी असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी एनआयएला त्यांचे मत नोंदवण्याची सूचना कोर्टने केली आहे.

18:27 March 01

व्हॉट्सअ‍ॅपने जानेवारीमध्ये बंद केली तब्बल 30 लाख खाती

नवी दिल्ली - IT नियम 2021 नुसार, जानेवारी 2023 चा अहवाल प्रकाशित केला असल्याचे व्हॉट्सअपने स्पष्ट केले आहे. या अहवालात वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या कारवाईचा तपशील तसेच WhatsApp च्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे. व्हॉट्सअ‍ॅपने जानेवारीमध्ये सुमारे 30 लाख खात्यांवर बंदी घातल्याचे त्यातून स्पष्ट होते.

17:11 March 01

ठाण्यात तब्बल दीड हजार किलो गोमांस जप्त

ठाणे - एका टेम्पोमधून 1,50,000 रुपये किमतीचे 1,500 किलो गोमांस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहन चालकाकडे गोमांस वाहतूक करण्याचा परवाना नसल्यामुळे भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काल रात्री मुंबई-नाशिक रस्त्यावरील खारेगाव टोलनाक्यावर हा टेम्पो अडवण्यात आला होता.

17:02 March 01

पालघरमध्ये 30 लाख रुपयांची दारू जप्त

पालघर - जिल्ह्यात आज 30,56,000 रुपयांची भारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL) जप्त करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी तलासरी येथे एक टेम्पो अडवला, असे ते म्हणाले. IMFL फक्त दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी पालघर जिल्ह्यात नेले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

16:56 March 01

साक्षीदारच नसल्याने, खून प्रकरणातून एकाची निर्दोष सुटका

ठाणे - सेशन्स कोर्टाने एका न्यायालयाने 45 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. त्याच्यावर आपल्या पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. फिर्यादीला साक्षीदार मिळू शकला नाही. त्यामुळे हा निर्णय देण्यात आला. यासंदर्भातील संपूर्ण निकाल आज हाती आला आहे. 24 फेब्रुवारीच्या आपल्या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भागवत यांनी आरोपी अतुल रेबीनाथ बर्मनला संशयाचा फायदा देत त्याची मुक्तता केली.

16:39 March 01

राज्यपालांनी दिल्लीत घेतली गृहमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दिल्लीत गृहमंत्रालयात अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती हे अजून समजले नाही.

16:34 March 01

जगभरात अनेक यूजर्सना ट्विटर आउटेजचा अनुभव, फीडच रिफ्रेश होईना

नवी दिल्ली - जगभरातील अनेक वापरकर्त्यांना ट्विटर आउटेजचा अनुभव येत आहे. वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे की, त्यांना फीड रिफ्रेश करता येत नाही.

16:21 March 01

नवीन विधिमंडळ हक्कभंग समिती 10 तारखेला संजय राऊतांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता

मुंबई - विधिमंडळ हक्क भंग समिती नव्याने नेमण्यात येणार आहे. विधिमंडळ हक्क भंग समितीसाठी सर्वपक्षीय सदस्यांकडून नावे मागवण्यात आली आहेत. हक्क भंग समिती संजय राऊतांना सुनावणीसाठी बोलावणार आहे. संजय राऊत यांना 10 मार्च रोजी सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

15:55 March 01

ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली, उद्या सर्वच बाजूचे युक्तीवाद पूर्ण करण्याची सरन्यायाधीशांची सूचना

नवी दिल्ली - ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. उद्या पुढील सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी पावणे बारावाजेपर्यंत शिंदे गटाला त्यांचा युक्तीवाद संपवण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर सॉलिसिटर जनरलही त्यांची भूमिका या प्रकरणात मांडतील. ठाकरे गटाचे वकीलही त्यांचे म्हणणे उद्या माडणार आहेत. त्यामुळे उद्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची घटनापीठासमोरील सुनावणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तशाप्रकारचे नियोजन तरी आज करण्यात आले आहे. उद्याच ही सुनावणी संपली तर या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

15:39 March 01

नैसर्गिक न्यायाच्या मार्गालाच तत्कालीन उपसभापतींनी हरताळ फासला - शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - तत्कालीन सरकार पडणार याची कल्पना सरकारला होती. तत्कालीन उपसभापतींना होती. त्यामुळेच त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले. त्यांना हे निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे नैसर्गिक न्यायाचाच मार्ग त्यांनी बंद करुन टाकला असा जोरदार युक्तीवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला.

15:26 March 01

सभापतींनी आमदार अपात्र ठरवले असते तर, सरन्यायाधीशांचा कौल यांना कळीचा सवाल

नवी दिल्ली - सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, समजा 27 तारखेला अंतरिम आदेश पारित झाला नसता आणि सभापतींनी त्यांना अपात्र ठरवले असते, तर राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव पुकारणे योग्य ठरले असते का?

15:14 March 01

नवाब मलिक यांना आज दिलासा नाहीच, सोमवारी जामिनावर पुढील सुनावणी

मुंबई - कुर्ला येथील मॉल आणि नवाब मलिक यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांचे वकील अमित देसाई यांनी हायकोर्टात केला. नवाब मलिक जामीन अर्जावर आजची सुनावणी न्यायालयाने तहकूब केली. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. मलिक यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी झाली. आज कोर्टाने काहीच निर्णय दिला नाही.

15:08 March 01

आमदारांनी सरकारच्या महाआघाडीवर विश्वास नसल्याचे पत्र दिल्याने राज्यपालांनी योग्य निर्णय घेतला - कौल यांचा यु्क्तीवाद

नवी दिल्ली - शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सरकार अल्पमतात आले होते. कारण आमदारांनी विद्यमान आघाडीवर विश्वास नसल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. त्यामुळे राज्यपालांना निर्णय घेणे बंधनकारक होते. हीच बाब बोम्मई खटल्याचा संदर्भ देऊन पटवून देण्याचा प्रयत्न कौल यांनी केला.

14:01 March 01

मरण पत्करेल पण बेईमानीचा शिक्का लावून घेणार नाही.. २०२४ ला सर्व हिशेब घेणार: संजय राऊत

कोल्हापूरमधून संजय राऊत यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अदानी नरेंद्र मोदींचा मित्र.. त्याला नोटीस नाही.. २०२४ ला सर्व हिशेब घेणार: संजय राऊत
  • मुलीचं लग्न केलं तरी आम्हाला नोटीस पाठवली
  • पक्ष सोडून जाण्यासाठी मला धमक्या
  • ईडी, सीबीआय आमच्या मागे लागलेत
  • मला पुन्हा तुरुंगात टाकतील पण मी घाबरणार नाही
  • आमच्यावरती खोट्या कारवाया सुरु
  • मरण पत्करेल पण बेईमानीचा शिक्का लावून घेणार नाही

13:50 March 01

संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या चौकशीचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांचे आदेश

मुंबई - संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यांनी दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे. भाजपने राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. राऊत यांनी विधानसभा सदस्यांना चोर म्हटले आहे. त्यावरुन गदारोळ सुरू आहे.

12:57 March 01

सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तीवाद, कोर्टाने उपस्थित केले अनेक प्रश्न, वकील कौल यांचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे गटातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील त्यांचा युक्तीवाद आज करत आहेत. ते विविध नियमांचा दाखला देऊन आपणच खरी शिवसेना कसे आहोत. तसेच राज्यपालांनी त्यावेळी घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत याचा युक्तीवाद करत आहेत. कोर्टाने त्यांच्या युक्तीवादावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देण्याचा शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोर्टाचा लंच ब्रेक झाला आहे. त्यानंतर पुढील सुनावणी सुरू होईल.

12:53 March 01

संजय राऊत यांचे संरक्षण १० मिनिटे काढा, सकाळी दिसणार नाहीत - आ. नितेश राणे यांची धमकी

मुंबई - संजय राऊत यांचे संरक्षण १० मिनिटे काढा. उद्या सकाळी दिसणार नाहीत. अशा प्रकारची धमकी सभागृहातच आ. नितेश राणे यांनी दिली आहे. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

12:41 March 01

कोर्टाने आमदारांना अपात्र ठरवणे म्हणजे जनादेशाचा भंग होऊ शकेल - कौल

नवी दिल्ली - शिंदे गटाचे वकील कौल यांचा विविध नियम दाखवून जोरदार युक्तीवाद सुरू आहे. तसेच त्यांनी एक कळीचा प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले की, स्पीकरने आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर केल्याशिवाय किंवा राज्यपालांनी ECI नुसार कारवाई केल्याशिवाय आमदाराला अपात्र ठरवावे असे न्यायालय कसे म्हणू शकते. असे केल्याने एकप्रकारे लोकांनी निवडून दिलेल्या जनादेशावरच यामुळे गदा येते, असे कौल म्हणाले.

12:32 March 01

संजय राऊत यांच्या विधानावरुन विधिमंडळात गदारोळ, विधानपरिषद तहकूब

मुंबई - विधिमंडळात संजय राऊत यांच्या विधानावरुन गदारोळ सुरू आहे. यावेळी आ. योगेश कदम यांनी संजय राऊत यांना अद्दल घडली पाहिजे, असे म्हटले आहे. भाजपने जो हक्कभंग प्रस्ताव आणला आहे त्याला माझा पाठिंबा आहे असे ते म्हणाले. यासंदर्भात सभागृहात गदारोळ झाल्याने विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

12:22 March 01

विधिमंडळ पक्ष आणि पक्ष वेगळे करता येणार नाहीत - शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - शिंदे गटाचे वकील कौल यांनी स्पष्ट केले की, दहाव्या परिशिष्टानुसार हा प्रश्न केवळ विधिमंडळ पक्षाचा आहे, राजकीय पक्षाचा नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोघे वेगळे आहेत असे मी कधीच म्हटले नाही. या निर्णयाला राजकीय पक्षाचा अधिकार आहे, असा आमचा युक्तिवाद आहे. कौल यांनी विधिमंडळ पक्ष आणि पक्ष वेगळे करता येणार नाहीत असा जोरदार युक्तीवाद नियमावलीचा आधार घेऊन करण्याचा प्रयत्न केला.

11:56 March 01

स्टॉक एक्सचेंज बाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी उचलले, भाई जगतापही ताब्यात

मुंबई - येथील NSE स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेर गौतम अदानी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेस नेते या ठिकाणी आंदोलन करत होते. यावेळी काँग्रेसचे मुंबई प्रमुख भाई जगताप यांना तर उचलून पोलिसांनी गाडीत घातले.

11:50 March 01

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - शंभूराज देसाई

मुंबई - संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे, असा घणाघात मंत्री शंभुराज देसाई यांनी केला. त्यांना ठाण्यामध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथे भरती करावे लागेल. विधी मंडळाला चोर म्हणून बोलणे हे त्यांना शोभते कसे. मग आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हेसुद्धा चोर आहेत का, असा सवालही देसाई यांनी केला.

11:11 March 01

२८ चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम सरकारनं राबवला: संजय राऊत

२०२४ ला सगळ्यांचा बदला घेणार

विधिमंडळात चोरमंडळ गेलंय असं मी म्हणालो

11:01 March 01

चोरांना सगळे चोरच दिसतात.. आशिष शेलारांनी संजय राऊतांवर टीका

मुंबई -शिवसेना खासदार, संजय राऊत यांनी आज विधान भवना वरच टीका करत विधान भवन एक चोर आहे असे सांगितले आहे. यावर भाजप नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. विधान भवनात ते बोलत होते.

10:59 March 01

विधीमंडळ नाही तर ४० जणांचं चोरमंडळ: संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापूर: विधीमंडळ नाही तर ४० जणांचं चोरमंडळ: संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप राऊतांवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत

09:44 March 01

काँग्रेसच्या पदयात्रेवर फेकले अंडे

भूपालपल्ली, तेलंगणा | मंगळवारी भूपालपल्ली येथे “हाथ से हाथ जोडो पदयात्रा” दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्यावर अंडी फेकण्यात आली.

08:12 March 01

ऑस्ट्रेलियात ३२ वर्षीय भारतीयाला पोलिसांनी गोळ्या झाडून केले ठार

३२ वर्षीय भारतीय नागरिक मोहम्मद रहमथुल्ला सय्यद अहमद यांची मंगळवारी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एका क्लिनरवर वार केल्यामुळे आणि पोलिस अधिकार्‍यांना चाकूने धमकावल्याच्या आरोपावरून गोळ्या घालून ठार केले, अशी माहिती द सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिली आहे.

07:17 March 01

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ..

नवी दिल्ली: घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलोच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103/ रुपयांपर्यंत वाढली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

07:11 March 01

WORLD INDIA MAHARASHTRA CRIME POLITICS BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY

देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा

Last Updated : Mar 1, 2023, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.