पालघर - अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी वसई न्यायालयात आरोपी शीझान खानच्या जामीन अर्जावर २ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. वालीव पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
Breaking News : नवी मुंबईतील विमल पेपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाला भीषण आग - जगातील ब्रेकिंग न्यूज
21:09 February 27
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण; शीझान खानच्या जामीन अर्जावर २ मार्चला सुनावणी
21:08 February 27
नवी मुंबईतील विमल पेपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाला भीषण आग
नवी मुंबई - येथील विमल पेपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमनने ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.
19:54 February 27
कायदा हे दडपशाहीचे साधन असू शकत नाही - हायकोर्टाची सरकारला चपराक
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने मंत्र्यावरील व्हिडीओसाठी केलेली एफआयआर रद्द केली. त्यावेळी IPC कलम 153A च्या गैरवापराविरुद्ध सरकारला हायकोर्टाने तंबीच दिली. लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखण्यासाठी कायद्याचा दडपशाहीचे साधन म्हणून वापर केला जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध नोंदवलेल्या दोन एफआयआर रद्द करताना कोर्टाने हे सुनावले. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्याची व्हिडिओ क्लिप शेअर केल्याबद्दलचा हा खटला होता. कोर्टाने उलट संबधित पोलिसाचा पगार कापून गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.
19:42 February 27
रेनिगुंटा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका खासगी कंपनीत आग, मोठी वित्तहानी
तिरुपती - आंध्र प्रदेशात तिरुपती जिल्ह्यातील रेनिगुंटा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका खासगी कंपनीत आज आग लागली. आग एवढी मोठी होती की दाट धुराच्या ढगांनी आजूबाजूच्या परिसराला वेढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही जीवित हानीचे अजून वृत्त नाही.
19:16 February 27
पुतीन यांची हत्या होईल तेही जवळच्या लोकांकडून - युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा
कीव - रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यावर त्यांच्या अगदी जवळच्या वर्तुळातील लोक नाराज आहेत, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केला आहे. त्यामुळे पुतीन यांची हत्या त्यांच्या नजिकच्या वर्तुळातील जवळच्या लोकांच्याकडूनच होईल असाही दावा झेलेन्सकी यांनी केला आहे.
19:12 February 27
फक्त शहराचे नाही तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचेही नाव बदलले - राजपत्र
मुंबई - उस्मानाबाद शहराबरोबरच जिल्ह्याचेही नाव धाराशिव करण्यात आले आहे. तसेच औरंगाबाद शहराबरोबरच औरंगाबाद जिल्ह्याचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती राजपत्राद्वारे जारी करण्यात आली आहे. महसूल तसेच वन विभागाच्या या राजपत्रानुसार यावर हरकती मात्र नोंदवता येणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय होईल.
18:41 February 27
नांदेड पोलीस मारहाण प्रकरणाची मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली दखल
नांदेड : पोलिसांच्या मारहाणीची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्याचे गृहसचिव आणि नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. गोवंशाची तस्करी करणारे वाहन अडवणाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. आता मानवी हक्क आयोगाकडून स्वतःहून घटनेची नोंद घेतली आहे.
17:32 February 27
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी
नवी दिल्ली - दिल्लीच्या रोज एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवले आहे. सुरुवातीला कोर्टाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.
17:14 February 27
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतली मुकेश अंबानी यांची भेट
मुंबई - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांची भेट घेतली. गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून ओडिशाची ताकद आणि राज्यातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भविष्यातील गुंतवणूक योजनांबद्दल चर्चा करण्यासाठी पटनायक यांनी मुकेश अंबानी यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
17:04 February 27
सिसोदिया यांच्या रिमांडवर कोर्टाने निर्णय ठेवला राखून
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांचा सीबाआयने 5 दिवसांचा रिमांड मागितला आहे. त्यावर रोज अव्हेन्यू कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.
16:20 February 27
मेडिकलच्या विद्यार्थिनीची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या
हैदराबाद - येथील एक मेडिकलची विद्यार्थिनी प्रीती यांनी दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली.. या विद्यार्थिनीने 4 दिवसांपूर्वी सीनिअर मोहम्मद सैफच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने विषारी इंजेक्शन घेतले होते.
16:04 February 27
सिसोदिया यांच्या रिमांडची सीबीआयची जोरदार मागणी
नवी दिल्ली - दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या 5 दिवसांच्या रिमांडची मागणी सीबीआयने केली आहे. सीबीआयने कोर्टात म्हटले आहे की, अतिशय नियोजनबद्ध आणि गुप्त पद्धतीने यासंदर्भातील अनियमितता झाली आहे. त्याची व्यवस्थित चौकशी करावी लागेल. दुसरीकडे वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी सिसोदिया यांच्या रिमांड अर्जाला विरोध केला आहे.
15:25 February 27
गायरान जमीन धारकांना थेट हुसकावून लावता येणार नाही - हायकोर्ट
मुंबई - राज्यातील सहा लाख गायरान जमीन धारकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. गायरान जमीन धारकांना थेट हुसकावून लावता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. आधी नोटीस द्या, तसेच हंगामी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला यांनी महाराष्ट्र शासनाला निर्देश दिले आहेत.
15:05 February 27
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बेळगावमध्ये रोड शो
बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच विमानतळाचे उद्घाटन केले. यानिमित्ताने त्यांनी बेळगावमध्ये रोड शो केला. हा रोड शो कशासाठी केला, त्याचे कारण मात्र समजू शकले नाही.
15:01 February 27
साताऱ्यात नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराची आत्महत्या
सातारा - प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर प्रेमवीराने राहत्या घरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील वांझोळी गावात घडली आहे. स्नेहल वैभव माळी, असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तर दत्तात्रय माळी, असे प्रेमवीराचे नाव आहे. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस घटनेमागील कारणाचा तपास करत आहेत.
14:58 February 27
सीबीआय माझ्या ताब्यात द्या द्या, 2 तासांत मोदी, अदानींना अटक करू - संजय सिंह
नवी दिल्ली - अटकेतून मुक्त झालेले आप आमदार संजय सिंह म्हणाले की, भाजप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी आणि सीबीआय त्यांच्यासोबत असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांना दोन तासांत अटक केली असती असा दावाही त्यांनी केला. तर केंद्रसरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
14:04 February 27
मुंबईत आम आदमी पक्षाचे आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घतले ताब्यात
मुंबई - आम आदमी पक्षाचे आंदोलन मुंबईत सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील अन्याय कारवाईच्या विरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत आंदोलन सुरू आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन याच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. यावेळी आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
13:59 February 27
एसआरए विकासकांना 11 कोटी भरण्याचे कोर्टाने फर्मान
मुंबई - आता 11 कोटी रुपये विकासकांनी भाडे भरा नाहीतर एसआरएच्या सीईओची टर्मिनेशन ऑर्डर काढणार असे न्या जी एस पटेल यांनी सुनावले आहे. एसआरए आणि बिल्डरांवर अक्षरशः कोर्टाने प्रहार केला आहे. 1995 पासून बिल्डरने 300 कुटुंबाना फसवले होते. मुंबई उच्च न्यायालयाने वकिलांना कठोर शब्दात तंबी दिली शुक्रवारपर्यंत भाडेपोटीचे 11 कोटी दिले पाहिजेच असे कोर्टाने फर्मान सोडले.
12:41 February 27
दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या काश्मिरी पंडितावर अंत्यसंस्कार
जम्मू काश्मीर: काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर पुलवामा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काल ते येथील स्थानिक बाजारपेठेत जात असताना दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
12:38 February 27
मनीष सिसोदियांना अटक करण्यासाठी सीबीआयवर मोठा राजकीय दबाव: केजरीवाल
नवी दिल्ली: "मला सांगण्यात आले आहे की बहुतेक सीबीआय अधिकारी मनीषच्या अटकेच्या विरोधात होते. त्या सर्वांना त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. परंतु त्याला अटक करण्याचा राजकीय दबाव इतका जास्त होता की त्यांना त्यांच्या राजकीय स्वामींचे पालन करावे लागले," असे ट्विट केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.
12:38 February 27
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दिल्लीत युवराज फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक ख्रिश्चन आणि डेन्मार्कच्या राजकुमार मेरी एलिझाबेथ यांची भेट घेतली.

12:34 February 27
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकातील शिमोगा विमानतळाचे उद्घाटन
शिवमोग्गा (कर्नाटक): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकातील शिमोगा विमानतळाचे उद्घाटन.
09:54 February 27
मंत्रालयाचं झाड हलवलं तर रोज १०० प्रकरण बाहेर येतील: संजय राऊत
मुंबई: मंत्रालयाचं झाड हलवलं तर रोज १०० प्रकरण बाहेर येतील, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या सभेला हजारोंची गर्दी जामी. गद्दारी केलेले ४० आमदार अपात्र ठरणार असून, निवडणूक आयोगाने काय शेण खाल्लं हेही समोर येईल. मनीष सिसोदियांना अटक होणार हे वाटतच होते. देशात आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांवर कोणते आरोप आहेत हेही पहा, असंही राऊत म्हणाले.
07:19 February 27
जंगलात होत असलेली अफूची शेती पोलिसांनी केली उध्वस्त
लोहरदगा, झारखंड | जंगलात होत असलेली अफूची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली १ एकर जमिनीत अफूची लागवड होत असल्याची माहिती मिळाली. आम्ही कारवाई करत आहोत, पुढील तपास सुरू आहे: आर रामकुमार, एसपी
07:18 February 27
मेघालय आणि नागालँडमध्ये मतदानाला सुरुवात
मेघालय आणि नागालँड या दोन्ही राज्यांतील 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान होत आहे - नागालँडमध्ये, अकुलुटो येथील भाजपचे उमेदवार काझेटो किनिमी बिनविरोध विजयी झाले; मेघालयमध्ये, यूडीपी उमेदवार एचडीआर लिंगडोह यांच्या निधनानंतर सोहियोंगची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
07:16 February 27
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन.. सत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपणार
मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन.. सत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपणार
07:07 February 27
आसाममध्ये ८ कोटींचे हेरॉईन जप्त
आसाम | पूर्व गुवाहाटी पोलिसांनी नालापारा, बसिष्ठा येथे विशेष कारवाईत 8 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. अब्दुल रोसीद, मुजम्मिल हक, मोहम्मद जमाल अली या तीन जणांना अटकः गुवाहाटी पोलिसांनी
06:59 February 27
MAHARASHTRA CRIME POLITICAL BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा