ETV Bharat / state

World Health Day 2023 : मुंबईत उपनगरीय रुग्णालय आरोग्य सेवेचा 'असा' होतोय कायापालट - How much gov hospitals in BMC

कोरोनाला फटका बसल्यानंतर बृहन्मुंबई महापा॑लिकेकडून उपनगरीय रुग्णालय आरोग्य सेवेचा कायापालट सुरू आहे. १६ पैकी ८ उपनगरीय रूग्णालयांचे पुनर्विकास व विस्तारिकरण प्रगतिपथावर आहे.

जागतिक आरोग्य दिन
World Health Day 2023
author img

By

Published : Apr 7, 2023, 11:12 AM IST

Updated : May 8, 2023, 1:17 PM IST

मुंबई - कोविड म्हणजेच कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्यावर आरोग्य सेवा तोकडी पडली होती. कोविड काळातील अनुभव पाहता महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य सेवा यांच्याप्रमाणेच उपनगरीय रुग्णालयांमधून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी काम सुरू आहे. मुंबईत दोन नवीन उपनगरीय रुग्णालये देखील आकार घेत आहेत. यामुळे तब्बल २ हजार ५५९ खाटा वाढणार आहेत. त्याच बरोबर सुपरस्पेशालिटी सेवा देखील मिळणार असून त्यासाठी १०९९ इतक्या खाटा उपलब्ध होणार आहेत.

खाटांची संख्या वाढणार - दहा रुग्णालयांची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्यांची सध्याची खाटांची क्षमता १ हजार ४०५ इतकी आहे. ती वाढून एकूण ३ हजार ९६४ इतकी होईल. म्हणजेच नवीन २ हजार ५५९ खाटांची भर पडणार आहे. सर्व १६ उपनगरीय रुग्णालयांची सध्याची असलेली एकूण खाटांची क्षमता ३ हजार ५८४ वरुन तब्बल २ हजार ५५९ रुग्णशय्यांनी वाढणार आहे. त्यामुळे सर्व उपनगरीय रुग्णालयांची मिळून एकूण रुग्णशय्या क्षमता ही ६ हजार १४३ इतकी होणार आहे.

अशी होणार रुग्णालये सज्ज - उपनगरीय रूग्णालयात सध्या ६ हजार ७९० कर्मचारी आहेत. त्यामध्ये सुमारे ५ हजार ५०० नव्या कर्मचाऱ्यांची भर पडून ही संख्या १२ हजार ९९० इतकी होणार आहे. आयसीयू, एनआयसीयू आणि आयपीसीयू खाटांची संख्या सध्या २४९ इतकी आहे. यामध्ये ४५६ इतकी भर पडत खाटांची संख्या ७०५ इतकी होईल. ऑपरेशन थिएटर आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये सध्या एकूण ८९ कक्ष आहेत. यामध्ये १३१ कक्षांची भर पडून आगामी कालावधीत ही संख्या २१२ वर पोहचणार आहे. येत्या काळात १ हजार ०९९ सुपरस्पेशालिटी खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सेवांही वाढणार - उपनगरीय रुग्णालयांमधून देण्यात येणाऱया सुपरस्पेशालिटी रूग्णशय्येअंतर्गत कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जरी, गॅस्ट्रो एन्टेरोलॉजी मेडिसीन एण्ड सर्जरी, नेफ्रॉलॉजी, डायलेसिस, युरोसर्जरी, हेमॅटोलॉजी एण्ड हेमॅटो ऑन्कॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बर्न्स, रेडिओथेरपी, केमोथेरपी, ऑन्कोसर्जरी, पॅडिएट्रिक सर्जरी, एन्डोक्रिनोली आदी उपचारांसाठी खाटा उपलब्ध होणार आहेत.

रुग्णालयांचे बळकटीकरण - याचाच एक भाग म्हणून, महापालिकेची उपनगरात १६ रुग्णालये आहेत. यापैकी पश्चिम उपनगरात के. बी. भाभा रूग्णालय (वांद्रे), सिद्धार्थ रूग्णालय (गोरेगाव), भगवती रूग्णालय (बोरिवली), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय (बोरिवली, पूर्व), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय (कांदिवली), पूर्व उपनगरामध्ये पंडित मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय (गोवंडी), क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रूग्णालय (विक्रोळी), एम. टी. अग्रवाल रूग्णालय (मुलुंड) या तीन रुग्णालयांचा पुनर्विकास, विस्तारिकरण करण्यात येत आहे. भांडूप मल्टीस्पेशालिटी रूग्णालय (नाहूर) आणि संघर्ष नगर रुग्णालय (चांदिवली) ही दोन नवीन रुग्णालये आकाराला येत आहेत.

हेही वाचाWorld Health Day 2023: जागतिक आरोग्य दिन; कोणकोणत्या वयोगटात होतात कोणते आजार, काय घ्यावी काळजी

Last Updated : May 8, 2023, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.