ETV Bharat / state

World Diabetes Day : जागतिक मधुमेह दिवस, मुंबईत १४ टक्के मृत्यू अवघ्या मधुमेहामुळे.. - 14 percent deaths due to diabetes

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस ( World Diabetes Day ) म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. दिवसेंदिवस जगभरात मधुमेहाच्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 13, 2022, 8:18 PM IST

मुंबई : चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे. यासाठी महापालिकेने आरोग्य चाचणी आणि जनजागृती सारखे उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.

14 जागतिक मधुमेह दिवस - दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन २०२१-२०२३ निमित्ताने मधुमेह देखभालीसाठी आरोग्य सेवांपर्यंत पोहोचावे ही संकल्पना जगभरात राबवली जात आहे. यंदा (२०२२) मध्ये देखील मधुमेह संदर्भातील गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वत्र अभियान राबविण्यात येत आहे.

१४ टक्के मृत्यू मधुमेहामुळे - आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation, IDF) या संस्थेच्या सन २०२१ च्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक ७ मधुमेही रुग्णांपैकी १ रुग्ण हा भारतीय आहे. आपल्या देशातील राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९-२०२० (National Family Health Survey - NFHS) नुसार, १५ वर्षे वयावरील निकष लक्षात घेता मुंबईत सुमारे १७ टक्के महिलांमध्ये तर १८ टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण (random sugar) १४० मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक आढळले आहे. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेने मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने सन २०२१ मध्ये केलेल्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार (Civil Registration System) एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असे नोंदवण्यात आले आहे.

मधुमेहाच्या रूग्णासांठी समुपदेशन सेवा - बृहन्मुंबई महापालिकेने अमेरीकेअर संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील सहा विभागांमध्ये 'असंसर्गजन्य आजार दिशा' हा घरोघरी सर्वेक्षणाचा उपक्रम राबवला आहे. यामध्ये तीस वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या दृष्टीने प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. एफ-उत्तर, एच-पूर्व, के-पूर्व, पी-उत्तर, एम-पूर्व आणि एल या सहा विभागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात एका वर्षात १ लाख ८३ हजार ६८२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यापैकी, उच्च रक्तदाबाचे ६ हजार ६३२ तर मधुमेहाचे ४ हजार ५४० नवीन रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने भारतीय आहारतज्ञ संघटना (Indian Dietician Association) यांच्या सहकार्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना आहार विषयक सल्ला देण्याची, समुपदेशन सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यातून मागील एक वर्षात २४ हजार २३० रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदल संदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे.

आरोग्य चाचणी, सर्वेक्षण करण्यात येणार - डिसेंबर २०२२ पासून महापालिकेच्या वतीने २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टीमध्ये, आरोग्य स्वयंसेविका आशा सेविका यांच्या सहकार्याने लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ३० वर्षे वयावरील व्यक्तींची उच्च रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात येतील. सदर आरोग्य चाचणी सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिक, प्रसार माध्यमे, बिगर शासकीय संस्था, खाजगी संस्था, कॉर्पोरेट यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे. तसेच मुंबईकर नागरिकांनी आपल्या नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये तसेच रुग्णालयांमधील असंसर्गजन्य आजार केंद्रांमध्ये जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब या दोन्ही गोष्टींची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी केले आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींपैकी किमान ५० टक्के नागरिकांना आपल्याला मधुमेह झाला आहे, हे निदान होईपर्यंत प्रत्यक्षात ठाऊकच नसते. तर ज्यांना मधुमेह आहे, त्यातील अनेक जण नियमितपणे उपचार घेत नाहीत. त्यामुळे आरोग्य विषयक गुंतागुंत टाळण्यासाठी जागरूक राहून नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घेणे, हे अत्यंत गरजेचे आहे असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

जनजागृती अभियान - नागरिकांनी दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, पोषक आहार आणि पुरेशा शारीरिक हालचाली, व्यायाम या बाबींचा अंगीकार करून सदर आजारांचा प्रतिबंध राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. वारंवार लघवीला जाणे, अचानक वजन कमी होत जाणे, थकवा, अतिशय तहान लागणे, अंधुक/अस्पष्ट दिसणे, हात-पाय सुन्न होणे अथवा त्यामध्ये सूज येणे, पायामध्ये जखम (अल्सर) होणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी तातडीने नजीकच्या महानगरपालिका दवाखान्यांमध्ये अथवा रुग्णालयांमध्ये जाऊन स्वतःची चाचणी करून घेणे आणि आरोग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब विषयक व्यापक जनजागृतीच्या दृष्टीने बृहन्मुंबई महापालिकेकडून लवकरच अभियान हाती घेतले जाणार आहे. यामध्ये जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर, रेडिओ संदेश, लघुपट यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य माहिती पोहोचवली जाईल, असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.