ETV Bharat / state

वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा

author img

By

Published : Jan 21, 2021, 3:48 PM IST

Updated : Jan 21, 2021, 7:34 PM IST

आज कोरोना नियंत्रणात येत असतानाही वर्क फ्रॉम होमला पसंती मिळत आहे. तर, दुसरीकडे याचा फायदा आता घरविक्रीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला झाला आहे. वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होममुळे 2020 मध्ये ग्राहकांचा मोठी घरे घेण्याकडे कल वाढला आहे.

Work from home construction sector benefits
वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारी-खासगी कार्यालये, सर्व प्रकारचे कामकाज बंद झाले. मग यातून मार्ग काढण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय पुढे आला आणि हा एक ट्रेंड बनला. आज कोरोना नियंत्रणात येत असतानाही वर्क फ्रॉम होमला पसंती मिळत आहे. तर, दुसरीकडे याचा फायदा आता घरविक्रीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला झाला आहे. वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होममुळे 2020 मध्ये ग्राहकांचा मोठी घरे घेण्याकडे कल वाढला आहे.

हेही वाचा - नरवीर बहिर्जी नाईकांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय - पर्यटन मंत्री ठाकरे

देशातील 7 आघाडीच्या शहरात होणाऱ्या घरविक्रीनुसार घरांच्या क्षेत्रफळात सरासरी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सर्वाधिक 21 टक्क्यांची वाढ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) झाली असून येथे 773 चौ. फुटावरून 932 चौ. फुटांची घरे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्याचवेळी हैद्राबादमध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या अर्थात 1 हजार 750 चौ. फुटाच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मालमत्ता बाजारपेठेतील आघाडीच्या अशा अ‌ॅनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनीच्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे.

2016 पासून घरांच्या सरासरी क्षेत्रफळात होत होती घसरण

मागील काही वर्षात घरांचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यातही मुंबई, पुण्यासारख्या शहरात घरे महाग झाली आहेत. मुंबईत तर गृहनिर्मितीसाठी जागाच नसल्याने छोट्या घरांची अधिक मागणी आहे. अशावेळी 2016 पासून कमी क्षेत्रफळाची, अर्थात छोट्या घरांची विक्री जास्त होताना दिसत आहे. त्यामुळेच, 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली, बंगळुरू, एमएमआर (मुंबई-ठाणे-नवी मुंबई-रायगड), पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या 7 शहरात घरांच्या क्षेत्रफळात 13 टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळेच 2016 मध्ये 1 हजार 440 चौ. फुटापर्यंतच्या घरांना अधिक मागणी होती. पण, ही मागणी घसरून 2017 मध्ये ती 1 हजार 260 चौ. फुटावर आल्याचे अ‌ॅनरॉकने म्हटले. तर 2018 मध्ये आकडा आणखी घसरून 1 हजार 160 चौ. फुटावर आणि 2019 मध्ये 1 हजार 50 चौ. फुटावर आल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

2020 मध्ये मात्र ट्रेंड बदलला

मागील चार वर्षापासून छोट्या क्षेत्रफळांच्या घरांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला होता. घरांच्या वाढत्या किमतीमुळे छोटी घरे अधिक खरेदी केली जातात. पण, आता मात्र 2020 मध्ये यात मोठा बदल झाल्याची माहिती अ‌ॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितली. देशातील 7 आघाडीच्या शहरात मोठ्या क्षेत्रफळाची घरविक्री आता होऊ लागली आहे. त्यानुसार 2020 मध्ये देशात घरांच्या क्षेत्रफळात सरासरी 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब असून आता सरासरी क्षेत्रफळ 1 हजार 50 चौ. फुटावरून 1 हजार 150 चौ. फुटावर गेल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम इफेक्ट

कोरोनामुळे देशात वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड सुरू झाला. हा ट्रेंड सगळ्यांच्याच पसंदीस पडला आहे. त्यामुळेच, आजही मोठ्या प्रमाणावर कंपन्या वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत. तर, शाळा-महाविद्यालयांनीही लर्न फ्रॉम होम सुरू केले आहे. अशावेळी या दोन्ही गोष्टींसाठी घरात पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. तर, शांतता ही आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत आता ग्राहकांना 100 ते 200 चौ. फूट मोठे घर खरेदी करताना दिसत आहेत, असेही पुरी यांनी सांगितले.

7 शहरात सरासरी 10 टक्के अधिक क्षेत्रफळाचे घर खरेदी

मुंबई-एमएमआरमध्ये 21 टक्के अधिक क्षेत्रफळाचे घर खरेदी करण्याकडे कल आहे. 7 शहरात सरासरी 10 टक्के अधिक क्षेत्रफळाचे घर खरेदी केले जात आहे. त्यानुसार एमएमआर 2019 मध्ये 773 चौ. फुटांच्या घरांची विक्री अधिक होत होती. तर, आता 2020 मध्ये वर्क फ्रॉम होममुळे 932 चौ. फुटापर्यंतच्या घरांची विक्री सर्वाधिक होत असून क्षेत्रफळातील ही वाढ 21 टक्के इतकी आहे.

सर्वाधिक वाढ ही मुंबई-एमएमआरमध्ये

7 देशातील सर्वाधिक वाढ ही मुंबई-एमएमआरमध्ये आहे. तर, हैदराबादमधील घरविक्रीचा आढावा घेतला असता येथील घराच्या क्षेत्रफळात केवळ 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मुळात हैदराबादमध्येच मोठ्या घरांची विक्री होताना दिसते. येथे 2019 मध्ये सरासरी 1 हजार 700 चौ. फुटांची घरे विकली जात होती. तर, आता 2020 मध्ये सरासरी 1 हजार 750 चौ. फुटाच्या घरांची विक्री होत आहे.

पुण्यातही मोठ्या घरांची मागणी वाढली

मुंबई-एमएमआरमध्ये मोठ्या घरांची खरेदी वाढली असून 21 टक्के मोठ्या क्षेत्रफळाची घरे खरेदी केली जात आहेत. अशावेळी पुणेही यात मागे नाही. कारण मुंबई-एमएमआरनंतर पुण्यात मोठ्या घरांची मागणी वाढली आहे. 2019 मध्ये सरासरी 878 चौ. फुटांची घरे विकली जात होती. तिथे आता 2020 मध्ये 986 चौ. फुटाची घरे मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत. तर, दिल्लीत 1 हजार 250 चौ. फुटावरून 1 हजार 290 चौ. फुटांची, बंगळुरूत 1 हजार 280 चौ. फुटावरून 1 हजार 320 चौ. फूट, चेन्नईत 1 हजार 100 चौ. फुटावरून 1 हजार 200 चौ. फूट आणि कोलकता येथे 1000 चौ फुटावरून 1 हजार 100 चौ. फूट अशा क्षेत्रफळाच्या घरांची विक्री वाढली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व पक्षीय खासदारांची बैठक

Last Updated : Jan 21, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.