ETV Bharat / state

तुटलेल्या झोपडीतून 'ती' पाहतेय देशासाठी फुटबॉल खेळण्याचं स्वप्न - MERI

सध्या एक मुलगी तुटलेल्या झोपडीतून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहत आहे. मेरी प्रकाश नायडू असे तिचे नाव असून फुटबॉलमध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.

मेरी प्रकाश नायडू
author img

By

Published : Mar 7, 2019, 7:54 PM IST

मुंबई - देशात महिलांना सोयी-सुविधा देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, खरे पाहिले तर त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. 'बेटी बचाव बेटी पढाव' असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात सध्या एक मुलगी तुटलेल्या झोपडीतून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहत आहे. मेरी प्रकाश नायडू असे तिचे नाव असून फुटबॉलमध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.

तिच्या खेळाचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केला होता. मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या ३ फुटबॉलपटूपैकी मेरी नायडू एक होती. मेरीने मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत वन मिलेनियम ऑफ महाराष्ट्राचा बहूमान मिळवला होता. परंतु आज मेरीची परिस्थिती खूप हलाखीची आहे.

मेरीने दहावीनंतर शिक्षण सोडल आहे. घरची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे ती शिक्षणापासून वंचित आहे. तिचे स्वप्न असलेला खेळ ती आता खेळत नाही. याच कारण म्हणजे मेरीच्या घरची परिस्थिती आहे. मेरी किंग सर्कलच्या पदपथावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या कापड लावलेल्या झोपडपट्टीत राहते. वडील कंत्राटी सफाई कामगार आहेत. घरी मेरीसह २ बहिणी आणि आई, असे कुटुंब आहे.

undefined

मेरीचे प्राथमिक शिक्षण महापालिका शाळेत व नंतर शाहू महाराज शाळा धारावी येथे झाले. ते करताना तिने फुटबॉल या खेळात नाव कमावले. परंतु घरची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला पुढे शिक्षण व खेळ चालू ठेवणे कठीण जात आहे. म्हणून तिने ते थांबवले आहे. सरकार मोठ्या गाजावाजा करत जागतिक महिला दिवस साजरा करेल पण खेळासाठी परिस्थितीशी दोन होत करणाऱ्या अशा मुलींचे काय? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मेरीसारखेच तिच्या दोन्ही बहिणींची स्वप्न आहेत. एकीला हॉकीपटू तर दुसरीला बॅडमिंटनपटू व्हायचे आहे.

फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या मेरीला सध्या मदतीची आवश्यकता आहे. आर्थिक अडचण आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मेरीच्या घरावर वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे गेल्या वर्षभरात ती कॉलेजला गेली नाही. कारण घरावर कधीही हातोडा पडू शकतो म्हणून, ती आताही झोपडीत राहून देशासाठी खेळण्याचे स्वप्नं पाहत आहे. मी सर्व संकटांना सामोरे जात ते पूर्ण करेन. तसेच एक जबाबदार महिला बनेने, अशी इच्छा तिने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.

मेरीने आतापर्यंत मिळवलेल्या अनेक प्रमाणपत्र, कमावलेली मेडल सध्या या झोपडीत धूळ खात पडलेली आहेत. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चार वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीच्या आयुष्यात अनेक संकटे येत आहेत. आम्हाला या दीड वर्षात कोणीही विचारले नसल्याची खंत मेरीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.

undefined

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक स्थानिक राजकीय पक्षांनी तिला मदत करण्याची आश्वासने दिली. मात्र, अद्याप तिला कोणतीही मदत मिळाली नाही. कारण सरकारचा नियम आहे फक्त आश्वासने द्यायची ती पूर्ण करायची नाहीत. जागतिक महिला दिवसानिमित्त अनेक महिलांचा सर्व स्तरावर सन्मान होतो. परंतु, मुंबईसारख्या शहरात राहून परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Intro:जागतिक महिला दिवस

मेरी तुटलेल्या झोपडीतून देशासाठी खेळण्याच स्वप्नं पाहतेय

मुंबई

देशात महिलांना सोईसुविधा स्कीम मोठ्या घोषणा केल्या जातात तसेच प्राधान्य दिल्याचे मोठया वार्ता केल्या जातात. खरे पाहता सरकार महिलांच्या कोणत्या सोयी-सुविधांकडे पाहत नाही असे दिसते. बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या देशात सध्या एक मुलगी ताकतीच्या जोरावर सगळ्या गोष्टींचा सामना करते सरकारी उदासीनता आपल्याला किंग सर्कलच्या पदपथावर झोपडीमध्ये अनेक हालअपेष्टा सहन करत उदयोन्मुख फुटबॉलपटू आपले क्रीडाप्रेम जोपासत असलेली मेरीची परिस्थिती पाहिल्यावर कळते. फुटबॉल मध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मेरी प्रकाश नायडू ही सतरा वर्षीय तरुणी आहे .तिच्या खेळाचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केला होता .मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या तीन फुटबॉल पटू पैकी एक मेरी नायडू होती. मेरी मिशन वाणी मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळाचे प्रदर्शन करीत वन मिलेनियम ऑफ महाराष्ट्राचा बहूमान मिळवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिला दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तिचा सत्कार झाला होता परंतु आज मेरीची परिस्थिती खूप हलाखीची आहे.

मेरीने दहावी शिक्षण झाल्यानंतर तिने आता शिक्षण सोडल आहे. कारण घरची परिस्थिती नसल्यामुळे ती शिक्षणापासून वंचित आहे आणि आणि तिचं स्वप्न असलेलं खेळ ही ती आता खेळत नाही आहे.ह्याच कारण म्हणजे मेरीच्या घरची परिस्थिती आहे.मेरी किंग सर्कलच्या पदपथावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या कापड लावलेल्या झोपडपट्टी राहते . वडील कंत्राटी सफाई कामगार घरी मेरी मागोमाग 2 बहिणी ,आई असे कुटुंब आहे.मेरीचं शिक्षण प्रथम महापालिका शाळेत व नंतर शाहू महाराज शाळा धरावी येथे झालं ते करत करत तिने फुटबॉल या खेळात नाव कमावले परंतु घरची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला पुढे शिक्षण व खेल चालू ठेवणं कठीण जात आहे म्हणून तिने ते थांबवले आहे. आज जागतिक महिला दिवस त्यानिमित्ताने महिलांचा अनेक ठिकाणी गौरव होईल आणि सरकार आपण महिलांसाठी काय केले असाही मोठ्या प्रमाणात गाजावाजा करीत परंतु मेरी सारखी एखादी मुलगी अशा परिस्थितीत झटत आहे तिचं काय असा प्रश्न उपस्थित होतो मेरी सारखे तिच्या दोन्ही बहिणींची स्वप्न आहेत एका बहिणीला हॉकीपटू आहे दुसऱ्या बहिणीला बॅडमिंटनपटू व्हायचंय परंतु एकाच मोठ्या बहिणीचे स्वप्न पूर्ण झाले नाही तर त्यांच्या घरचे कसे या दोन्ही मुलींचे स्वप्न पूर्ण करू शकतील हा प्रश्न उपस्थित होतो

फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या मेरीला सध्या मदतीची आवश्यकता आहे आर्थिक अडचण आणि घरावर वारंवार अतिक्रमण होणारे अतिक्रमण यामुळे यंदा ती अकरावीत असणारी मेरी गेल्या वर्षभरात कॉलेजला गेली नाहीये कारण घरावर कधीही हातोडा पडू शकतो म्हणून ,पण ती आताही झोपडीत राहून देशासाठी खेळण्याचे स्वप्नं पाहतेय आणि मी सर्व संकटांना सामोरं जात ते पूर्ण करेन व मीही एक जबाबदार महिला बनेने अशी ईटीव्ही भारतशी बोलताना मेरी सांगते.

मेरी ने केलेल्या कामगिरीनंतर तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले वडील महानगरपालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतात पूजा चालवावे लागत असल्यामुळे तीन मुली आणि घरचा खर्च उचलण्याचा अनेक अडचणी येत असल्याचे तिची आई सांगते मेरी आतापर्यंत मिळवलेल्या अनेक प्रमाणपत्र गळ्यातील कमावलेली मेडल सध्या या झोपडीत धूळ खात पडलेली आहेत गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चार वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये हजार रुपयाचे नुकसान झाले त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीची आयुष्यात संकटाची कमी नाहीये आश्वासने फक्त आश्वासने राहिली असून आम्हाला या दीड वर्षात कोणीही विचारलं नसल्याची खंत मेरी ची आई व बाबा व्यक्त करतात

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही तसेच अनेक स्थानिक राजकीय पक्षांनी तिला मदत करण्याची आश्वासने दिली मात्र याबद्दल अजूनही तिला कोणतीही मदत मिळाली नाही कारण सरकारचा नियम आहे फक्त आश्वासने द्यायची ती पूर्ण करायची नाहीत आज जागतिक महिला दिवस अनेक महिलांचा सर्व स्तरावर सन्मान होतो परंतु मुंबईत सारख्या शहरात राहणारी मेरी या परिस्थितीत आहे यावरून म्हणता येईल का की जागतिक महिला दिवस हा आनंदाने यामुळें साजरा होतोय.

Body:h

Conclusion:h

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.