मुंबई - विक्रोळीतील सक्षम महिला मंडळाच्या महिलांनी विक्रोळी पश्चिम येथील सैनिकी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सैनिकी भांडार कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. देशाची, आपली सुरक्षा करणारे खरे भाऊ आहेत, असे म्हणत त्यांना सैनिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशात वर्षभर विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करत असतो. मात्र, देशात नैसर्गिक आपत्ती, मानवी संकट आले. त्यावेळी सैनिक धावून येतात. मात्र, या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या सैनिकांना कोणत्याही प्रकारचा सण-उत्सव साजरा करता येत नाही. मायभूमीची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. भाऊ बहिणीचा प्रेमाचा रक्षाबंधन, दिपावलीतील भाऊबीज, बंधुभावाचा रमजान ईद, अशा अनेक उत्सवांची सैनिक आतुरतेने वाट पाहात असतात. त्यामुळेच या महिलांना सैनिकी बांधवाना राखी बांधण्याचे ठरवले.
रक्षाबंधन सण बहीण भावाच्या नात्यातील एक पवित्र सण आहे. आज या सणासाठी आमच्यासोबत बहीण, मुलगी, नाही आहे. मात्र, या महिलांनी आम्हाला राखी बांधली. या क्षणाचे फोटो आम्ही आमच्या बहिणीला दाखवतो. त्यावेळी आपण नसताना आपल्या भावाला दुसऱ्या बहिणींनी राखी बांधली हे बघून त्यांना आनंद होत असतो, असे सुभेदार जुनेद अहमद म्हणाले.