ETV Bharat / state

'त्या' महिला सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे मिळाले चोरीला गेलेले बाळ - मुंबई

मुंबईतील नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून शीतल साळवी यांचे ५ दिवसांचे बाळ एका महिलेने पळवून नेले होते.  यानंतर एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे काही तासातच बाळ चोरणारी महिला पोलिसांच्या तावडीत सापडली आहे.

महिला सुरक्षरक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेले बाळ पुन्हा मिळाले
author img

By

Published : Jun 14, 2019, 4:26 PM IST

Updated : Jun 14, 2019, 7:27 PM IST

मुंबई- शहरातील नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून शीतल साळवी यांचे ५ दिवसांचे बाळ एका महिलेने पळवून नेले होते. यानंतर काही तासातच बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध मुंबई पोलिसांच्या अग्रीपाडा पोलिसांनी लावला. एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे बाळ चोरणारी महिला पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. स्नेहल मंदार राणे असे त्या महिला सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे काही तासातच बाळ चोरणारी महिला पोलिसांच्या तावडीत सापडली आहे.

स्नेहल राणे या गेली ५ वर्षे मुंबईतील सांताक्रूज परिसरातील विएन देसाई रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी स्नेहल राणे रुग्णालयात रात्र पाळीला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता हेजल क्रोरिया या महिलेने नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून शीतल साळवी यांचे ५ दिवसांचे बाळ पळवून नेले होते. त्यानंतर हेजल क्रोरिया ही महिला बाळाला घेऊन विएन देसाई रुग्णालयात आली. यावेळी तिने महिला सुरक्षारक्षक स्नेहल राणे यांना सांगितले की, ती नालासोपऱ्यातून आली असून तिने या बाळाला घरातच जन्म दिला आहे. तसेच बाळाला व तिला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंतीही केली.

मात्र, चोरी केलेल्या बाळाच्या नाळेला चिमटा लावण्यात आला होता. जो फक्त महानगर पालिकेच्या रुग्णालयातच लावण्यात येतो. त्यामुळे स्नेहल यांना त्या महिलेवर संशय आला. या संदर्भात स्नेहल यांनी रुग्णालयात असलेल्या पोलीस कर्मचारी गायकवाड यांना सांगितले. त्यानंतर या महिलेला रुग्णालयातच थांबवून ठेवण्यात आले. सोशल मीडियावर चोरी झालेल्या बाळाचे फोटो व सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने या संदर्भात अग्रीपाडा पोलिसांनाही सूचना देण्यात आली.

बाळ होत नसल्याने घरच्यांकडून होत होता त्रास-

हेजल क्रोरिया या आरोपी महिलेला लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा अपत्य होत नव्हते. परिणामी घरच्यांच्या जाचाला त्रासून आपण बाळ चोरण्याचे ठरवले आणि मुंबईतील नायर रुग्णालयातून बाळाची आई झोपली असताना बाळ चोरून पळ काढला असे, तिने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत म्हटले आहे. मात्र, या संदर्भात आणखी काही कारण असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:मुंबईतील नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 7 मधून शीतल साळवी यांच 5 दिवसांच बाळ चोरी केल्यानंतर काही तासातच बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध मुंबई पोलिसांच्या अग्रीपाडा पोलिसांनी लावला . मात्र या बाळाला चोरणाऱ्या महिलेला पोलिसांच्या तावडीत एका महिला सुरक्षकामुळे सतर्कतेमुळे लागला आहे. Body:मुंबईतील सांताक्रूज परिसरातील वि एन देसाई स्नेहल मंदार राणे या गेली 5 वर्षे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत, गुरुवारी वि एन देसाई रुग्णालयात रात्र पाळीला सुरक्षा रक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या, गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता नायर रुग्णालयातून बाळ चोरी केल्यावर हेजल क्रोरिया ही महिला बाळाला घेऊन वि एन देसाई रुग्णालयात आली. यावेळी तिने महिला सुरक्षारक्षक स्नेहल राणे यांना सांगितले की ती नालासोपऱ्यातून आली असून तिने या बाळाला घरातच जन्म दिला आहे. त्यामुळे बाळाला व तिला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केल्यावर स्नेहल याना संशय वाटला . संशय येण्याचे करण म्हणजे चोरी केलेल्या बाळाच्या नाळेला चिमटा लावण्यात आला होता जो फक्त महानगर पालिकेच्या रुग्णालयातच लावण्यात येतो. या संदर्भात स्नेहल यांनी रुग्णालयात असलेल्या पोलीस कर्मचारी गायकवाड यांना सांगितले असता रुग्णालयातच या महिलेला थांबवून ठेवण्यात आले. सोशल माध्यमांवर चोरी झालेल्या बाळाचे फोटो व सीसीटीवी फुटेज व्हायरल झाल्याने या संदर्भात अग्रीपाडा पोलिसांना सूचना देण्यात आली. Conclusion:बाळ होत नसल्याने घरच्यांकडून होत होता त्रास----

हेजल क्रोरिया ह्या आरोपी महिलेला लग्नाला खूप वर्ष होऊन सुद्धा अपत्य होत नव्हते परिणामी घरच्यांच्या जाचाला त्रासून आपण बाळ चोरण्याचे ठरवून मुंबईतील नायर रुग्णालयातून बाळाची आई झोपली असताना नकळत बाळ चोरून पळ काढल्याचे तिने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत म्हटले आहे. मात्र या संदर्भात आणखीन काही कारण असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

( बाईट व पिटीसी जोडला आहे , कृपया वापरावा.ल
Last Updated : Jun 14, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.