मुंबई : पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना (Maharashtra Police Force) बारा तास ड्युटी मुळे मानसिक त्रास होत होता परिणामी त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कुटुंब आणि कर्तव्य जबाबदारी पार पाडत असतांना त्यामध्ये ताळमेळ असावा याकरिता बारा तास वरून आठ तास ड्युटी (Women police are now on duty for eight hours) करण्यात आली आहे जेणेकरून पोलीस महिला कर्मचाऱ्यांना दोन्ही कर्तव्य व्यवस्थित पार पाडता येईल आणि त्यांच्या आरोग्यावर देखील कुठलाही परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे त्यांचे रजा मागण्याचे, गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल. शिवाय आठ तासांची डय़ुटी करून त्यांना कुटुंबाला देखील वेळ देता येईल. याबाबत राज्यातील महिला अंमलदारांनी आठ तासांची डय़ुटी करावी अशी विनंती महासंचालकांकडे केली होती. या सर्व बाबींचा विचार करून महिला अंमलदारांना आठ तासांची डय़ुटी द्या असे लेखी निर्देश महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांना दिले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सध्या आठ तास डय़ुटी सुरू करून पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याबाबत सांगितले आहे.
Women Police Maharashtra : महाराष्ट्र पोलीस दलातील महिलांना आता आठ तास ड्युटी - महिला पोलिसांना आता आठ तास ड्युटी
महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police Force) महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला पोलिसांना आता आठ तास ड्युटी (Women police are now on duty for eight hours) करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांनी संबंधित पोलिस आयुक्तांना दिले आहेत. घर आणि काम अशी दुहेरी भूमिका बजावणाऱया महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.