मुंबई- कोरोना संक्रमित पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनेही आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. आत्महत्या करण्याअगोदर महिलेने लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या सुसाइड नोटनुसार पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
घराखाली राहणाऱ्या कुटुंबाकडून दिला जात होता त्रास
साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तुलीपिया या इमारतीत राहणाऱ्या रेश्मा ट्रेनचिल या महिलेने तिच्या दहा वर्षाच्या मुलासोबत इमारतीच्या बारावा मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर साकीनाका पोलिसांकडून तपासादम्यान पोलिसांना रेश्मा यांनी लिहलेली सुसाइड नोट आढळून आली. या सुसाइड नोटमध्ये तिने त्याच इमारतीत राहणाऱ्या आयूब खान, शहनाज खान व शादाब खान या तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.
रेश्माविरुद्ध वारंवार सोसायटीकडे आणि पोलिसांकडे तक्रार
रेश्माच्या घरात चालण्याचा, पळण्याचा जोरात आवाज येतो म्हणून या तिघांनी रेश्माविरुद्ध वारंवार सोसायटीकडे आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळून रेश्माने आत्महत्या केल्याचे सुसाइट नोटवरून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शादाब खान याला अटक केली आहे.
हेही वाचा -जळगावात भरधाव बसने दोन दुचाकींना उडवले, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी