मुंबई - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षकांना नोटीस बजावत तत्काळ अहवाल मागवला आहे. तसेच याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
हिंगणघाट येथे झालेल्या या अमानवीय कृत्याचा देशभरात संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जालना येथेही अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. याचीही महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणा संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी नोटीस बजावत अहवाल मागविण्यात आला आहे.