ETV Bharat / state

Woman stolen baby : मुंबईत बाळ चोरणारी टोळी सक्रिय, काळाचौकी परिसरात तीन वर्षीय बाळाची चोरी - Baby Stolen By Woman in Mumbai

काळाचौकी परिसरातील एका महिलेला जुन्या मोबाईलच्या बदल्यात बास्केट देण्याचे आमिष दाखवून घरातील महिलेला गुंगीचे औषध देत एका बाळाची चोरी ( Woman stolen baby ) केल्याची धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 30 नोव्हेंबर) घोडपदेव परिसरात घडला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2021, 9:14 PM IST

मुंबई - काळाचौकी परिसरातील एका महिलेला जुन्या मोबाईलच्या बदल्यात बास्केट देण्याचे आमिष दाखवून घरातील महिलेला गुंगीचे औषध देत एका बाळाची चोरी ( Woman stolen baby ) केल्याची धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 30 नोव्हेंबर) घोडपदेव परिसरात घडला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

घोडपदेव येथील संघर्ष सदन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे बजरंग मगदूम यांच्या घरी मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास एक महिला जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडे विक्री करण्यासाठी आली. तिच्याकडे बाळासाठीचे बास्केट पाहून तिला घरातील जुने मोबाईल दाखवले. मात्र, मोठ्या मोबाईलवरच बास्केट मिळणार असल्याचे सांगून महिला निघून गेली.

काही वेळात दुसरी महिला घरी आली. सासूने पाठवल्याचे सांगत, तुमच्याकडील मोबाईल घेऊन बास्केट द्यायला आली असल्याचे सांगितले. सपना यांनी तिच्यावर विश्वास ठेवून मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये वळताच पाठीमागून महिलेने तोंडाला रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर बाळाला घेऊन पसार झाली आहे. काही वेळाने घरी आलेल्या नातेवाईकांना सपना बेशुद्ध दिसल्या. शुद्धीवर येताच, त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. तसेच बाळ गायब असल्याचे माहिती मिळताच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा - ममता बॅनर्जींंच्या काँग्रेस टीकेनंतर राष्ट्रवादी अडचणीत ? शरद पवारांची राष्ट्रवादी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.