मुंबई - बोरीवलीमध्ये अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या सासूचा, सुनेने प्रियकराच्या मदतीने डोक्यात दगड खून केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करून पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी सून आणि तिचा प्रियकर या दोघांना बेड्या ठोकल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलूबाई लाखे (वय 57) या सून राधा (वय 28) हिच्याबरोबर राहतात. राधाचा पती त्याच्या कामानिमित्त सतत घराबाहेर असायचा, त्यामुळे राधाचे त्याच परिसरात राहणाऱ्या दीपक माने या युवकाशी प्रेमसंबंध जुळले. याची कुणकुण सासू सलूबाई यांना लागली. तेव्हा, हा प्रकार मुलाला सांगणार असल्याचे सलूबाईंनी सांगितले. यानंतर सलुबाईचा काटा काढण्याचा कट राधा आणि दीपकने रचला.
असा रचला कट -
25 ऑक्टोबर रोजी गरबा खेळण्याच्या बहाण्याने राधा घराबाहेर गेली. मात्र, तिने जाण्यापूर्वी घरामध्ये एक मोठा दगड आणून लपवून ठेवला. सलूबाई या घरात झोपल्यानतर दीपकसह राधा तिथे आली आणि दीपकने तो लपवलेला दगड झोपलेल्या सलूबाईंच्या डोक्यात घातला. यानंतर काही वेळातच सलुबाई यांचा मृत्यू झाला.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता आरोपी महिला व दीपक माने या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे त्यांना कळाले. या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, दोघांनी सलूबाईचा खून केल्याचे कबूल केले.
हेही वाचा - उत्सव काळात कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वे गाडी...मध्य रेल्वेची घोषणा
हेही वाचा - नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात