मुंबई - बाईकमध्ये प्रॉब्लेम आहे का?...थांबा नीट करते. असा आवाज विक्रोळीमधील चेतक बाईक केअर गॅरेजमध्ये गेल्यावर ऐकू येतो. अप्रेन घालून आणि हातात पाना घेऊन एक महिला मोटरसायकल दुरुस्त करत असल्याचे दिसते आणि आपण आश्चर्यचकीत होतो. जयश्री बागवे असे मोटारसायकल मॅकेनिकचे नाव आहे.
एसएनडीटी विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात पदवी घेतलेल्या जयश्री या सुरुवातीला चेतक बाईक केअर गॅरेजमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून रूजू झाल्या. यानंतर मोटर मॅकेनिक क्षेत्रात करिअर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कोहिनूर टेक्निकलला मोटर मेकॅनिक या ट्रेडला प्रवेश घेतला. त्यावेळी 10 मुलामध्ये त्या एकट्या मुलगी होत्या. मोटर मॅकेनिक व्हायचे या ध्यासाने पछाडले आणि मी आज मॅकेनिक झाले, असे जयश्री सांगतात.
हेही वाचा - महिला दिन विशेष : भेटा नव्वदीच्या चिरतरुण समाजसेविकेला
मराठी माणसे गॅरेज व्यवसायात कमी आहेत. मुली या क्षेत्रात यायला हव्यात, असे मत जयश्री व्यक्त करतात. या क्षेत्रात मुलींनी यायला हवे, असे आवाहन त्या करतात. या क्षेत्रात जेव्हा आले तेव्हा अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण मी कामाशी प्रामाणिक राहिले. संधी मिळणे महत्त्वाचे, असेही जयश्री म्हणाल्या.
दररोज 6 मोटरसायकली त्या दुरुस्त करतात. मोटर सायकल पार्ट्स आणि टेक्निकल बाबी आदी ज्ञान त्यांनी आत्मसात केले आहे. सुरुवातीला या क्षेत्रात काम करताना खच्चीकरण झाले. पण जिद्द कायम ठेवली. गॅरेजमध्ये गाडी धुण्याची व्यवस्था आहे. दुचाकी दुरुस्ती झाल्यावर त्या स्वतः वॉश करतात.
हेही वाचा - महिला दिन विशेष: बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या कंगनाचा 'पद्मश्री' पर्यंतचा प्रवास....