मुंबई: कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १९ हजार १८५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७६५ नवे रुग्ण नोंदवण्यात आले ( Mumbai Corona Update ) आहेत. ७३९ रुग्णांना उपचारा नंतर सोडण्यात आले. आतापर्यंत १० लाख ७३ हजार ५४१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४६ हजार ९७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८६६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७९ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १७६५ रुग्णांपैकी १६८२ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५९८ बेड्स असून त्यापैकी २९३ बेडवर रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारावर रुग्णांची नोंद झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. त्यानंतर रुग्ण संख्येत पुन्हा वाढ पहायला मिळत आहे. १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा : BA5 subvariants of Omicron in Pune : राज्यात आणखी एका रुग्णांमध्ये बी ए 5 व्हेरियंट