मुंबई : देशात वाढलेले बेरोजगारी, वाढलेल्या सामान्य वस्तूंच्या किमती यामुळे जनता पहिलेच त्रस्त आहे. त्यात आता दोन हजार नोटा काही दिवसात बंद होणार आहे. यावरून देखील जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. देशातील जनता सर्व जाणती आहे. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देखील दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या कांदा, ऊस तसेच इतर शेतीमालाला भाव नाही. वाटेल तेव्हा निर्यात बंद करतात, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसतो. त्यामुळे शेतीच्या पिकांना भाव मिळत नाही.
केंद्र सरकारचे बदलणारे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर येणारे आहे. त्यामुळे जनता एकदाच विचार करते हे कर्नाटक निकालात जनतेने दाखवून दिले आहे. - छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस
दिग्गज नेते पवारांच्या भेटीला : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस सोबत आल्यास किंवा काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी संदर्भात सध्या देशभरात चाचपणी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपा विरोधातील छोटे-मोठे पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, गेल्या आठवड्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेतली. देशपातळीवर भाजपा विरोधात मूठ बांधण्याकरिता सीपीएम पक्षाचे नेते सिपीएम नेता डी. राजा यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती.
सर्वसामावेशक नेतृत्व : भाजपा विरोधातील विरोधातील सगळ्या पक्षांची मूठ बांधली जात आहे. भाजप विरोधातील नेमका चेहरा कोण असणारे हे जरी आता सांगता येत नसले तरी, शरद पवार सगळ्या विरोधकांना एकत्र आणणारा एकमेव चेहरा आहे. सर्व समावेशक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी देखील आपण अनेक वेळा बघितला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये प्रादेशिक पक्ष असो किंवा छोटे पक्ष असो सर्वांना एकत्र येऊन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका घेतल्या आहेत. चर्चा करून तशा प्रकारची आघाडी निर्माण करून भारतीय जनता पार्टीला एक मोठा आव्हान उभे करण्याची मोहीम राबवली आहे. सातत्याने शरद पवार यामध्ये पुढाकार घेत आहे. तसेच त्या पक्षाने देखील त्यांना प्रतिसाद दिला आहे.
भाजपा विरोधात चेहरा कोण असणार हा भाग गौण असला तरी सर्वसामावेशक नेतृत्व केंद्रस्थानी म्हणून शरद पवार येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. - संजय मिस्किन, राजकीय विश्लेषक
सर्वच विरोधी पक्ष कामाला : देशात भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष कामाला लागले आहे. त्यातच भाजपाचा विरोधी चेहरा कोण यावर मात्र काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये एक मत होत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. येणाऱ्या काळात शरद पवारांची राजनीती त्यांना केंद्रातील राजकारणात भाजपाला पराभूत करण्यात किंग मेकर बनवेल का हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा -