मुंबई : राज्यातील शिंदे फडणीस सरकारला पायउतर करायचा असेल तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुट ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः कंबर कसली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे आपापसातील धुसपूस चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहतील का यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकार हे चुकीच्या पायावर स्थापन झाले आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही हे सरकार टिकून राहणार आहे. यातून महाविकास आघाडीने धडा घेण्याची गरज आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजूट राहिले तरच सत्तेचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असणार आहे. - राजकीय विश्लेषक युवराज मोहिते
नाना पटोले यांना लक्ष करू नये : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार एक स्टेटमेंट दिले त्यात त्यांनी म्हटलं त्यावेळेस काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा जर दिला नसता तर वेगळा परिणाम असता. तात्कालीन विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा संदर्भातील खुलासे वारंवार आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांसमोर केले आहे. तो विषय काढण्याची गरज नाही. कारण न्यायालयाच्या निर्णयात कोठेही तत्कालीन विधानसभा अध्यक्षांच्या राजीनामा दिल्यामुळे हा प्रकार घडला असं कोठेही निरदर्शनास आणलं नाही. एकच गोस्ट डोळ्यासमोर येते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तातडीने दिल्यामुळे सर्व प्रकार घडला. यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाना पटोले यांना लक्ष करू नये अशा प्रकारचा इशारा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला आहे.
तीनही पक्षात धुसफूस : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकी वरून देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील धुसफुस पाहायला मिळाली होती. काही ठिकाणी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिल्याने नाना पटोले नाराज झाले होते. त्यावेळी अजित पवार विरुद्ध नाना पटोले शब्द बाण पाहायला मिळाले. कालच लागलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नंतर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा नाना पटोले यांनी द्यायला नको होता. ही आमची चूक झाली. यावर अजित पवार यांनी काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
तिन्ही पक्षात एकामेकावर टीकाटिप्पणी : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय आला असून त्याबाबतचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण सध्या सुरू आहे. असे देखील आता अधोरेखित होत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जर दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा त्यांना पुनर्प्रस्थापित करण्याचा निर्णय कदाचित घेतला असता. दुसऱ्या बाजूला तिन्ही पक्षात एकामेकावर टीकाटिप्पणी करत आहे. शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर नसल्याचे अधोरेखित केले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजूट राहिले तरच सत्तेचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक युवराज मोहिते यांनी व्यक्त केले आहे.
नेत्यांकडून एकमेकांवर तोंड सुख : राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकसंघ ठेवून भविष्यातील एकजूट टिकवण्यासाठी स्वतः मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहे. मात्र दुसरीकडे महत्त्वाच्या नेत्यांकडून एकमेकांवर तोंड सुख घेणे थांबत नाही. त्यामुळे तिन्ही पक्षात एकजुठ ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा
- Congress Majority For Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 136 जागांवर विजय