ETV Bharat / state

Mahavikas Aghadi : कर्नाटकचा निकाल महाविकास आघाडीला नवसंजीवनी देणार का?

शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर शिंदे फडवणीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली होती. दुरीकडे कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला असला तरी त्यातून महाविकास आघाडीला नव संजीवनी मिळणे सोपे होऊ शकते.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
author img

By

Published : May 14, 2023, 7:33 PM IST

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला- राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे सरकार राज्यात आल्यानंतर शिंदे फडवणीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली होती. दुरीकडे कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला असला तरी त्यातून महाविकास आघाडीला नव संजीवनी मिळणे सोपे होऊ शकते. या विश्वासाचा फायदा घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मनकी बात जनता ऐकणार नाही : कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या आहे. देशाच्या दक्षिण भागात लोकसभेच्या जवळ जवळ 179 जागा आहे. जर भाजपा विरोधातील पक्ष एकत्र लढले तरच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येणार आहे.

महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या 48 जागा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट ) एकत्र लढलो तर 48 पैकी 42 जागा आम्ही नक्की जिंकू - अमोल मातेले, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणूकमध्ये परिवर्तन : इतक्या प्रमाणत लोकसभेच्या जागा कमी झाल्यावर भाजपचा जो काही भ्रमाचा फुगा आहे तो 2024 ला फुटल्या शिवाय राहणार नाही. गेल्या नऊ वर्षात देशात आर्थिक व्यवस्तेचा बोजवारा उडाला आहे .प्रचंड बेरोजगारी त्यासोबत महागाई देखील वाढली आहे. घरगुती वस्तूंच्या गॅसच्या किमती वाढलेले आहे. इतकी महागाईची झळ ही सामान्य जनतेला बसत आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये ही सामान्य जनता नरेंद्र मोदी चले जावचा नारा स्वतःच देणार आहे. भारतीय जनता पार्टीची आता उतरती कळा सुरू झाली आहे. भाजपने कितीही घोषणा केल्या, कितीही मन की बात केलि तरी सर्व सामान्य जनता मनकी बात ऐकणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मातेले यांनी दिली आहे.

माविआला बूस्टर डोस : कर्नाटक राज्याचा काल निकाल आला त्यामध्ये तेथील सुज्ञ जनतेने काँग्रेसच्या पारड्यामध्ये 136 जागा दिल्या. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्यात देखील येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये परिणाम होऊ शकतो. महाविकास आघाडीला याचा फायदाच होणार आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पोट निवडणूका, बाजार समित्या महाविकास आघाडी पक्षांनी एकत्र लढल्यामुळे घवघवीत यश संपादन झाले.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालामुळे तर माविआला बूस्टर डोस मिळाला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही - काँग्रेस प्रवक्ते, काकासाहेब कुलकर्णी

जबाबदारीने वागावे लागणार : कर्नाटक राज्यातील निवडणुकीमुळे निश्चितच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यासोबत विरोधी पक्षातील जे नेते आहेत त्यांच्यामध्ये देखील उत्साह पाहायला. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेते देखील आता जबाबदारीने बोलताय पुढील पावले जबाबदारी टाकायची तयारी करत आहे. कर्नाटक निकालने काय दिले. एक आत्मविश्वास दिला की आपण भाजपाला हरवू शकतो. भाजपा विरोधात आपण उभं राहू शकतो. कर्नाटक मध्ये काँग्रेस ने एक हाती सत्ता संपादित केली आहे. हे पुन्हा एकदा घडू शकते. हा आत्मविश्वास आता भाजपाविरुद्ध असलेल्या पक्षांना आला आहे. केंद्रातील भाजपाविरुद्ध देखील नितीश कुमार मूठ बांधत आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मूठ : राज्यात देखील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मूठ अधिक मजबूत व्हावी यासाठी देखील आता प्रयत्न सुरू झाले आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आता जबाबदारीने वागावे लागणार आहे. एकमेकातील टीका टोमणे बंद करावा लागणार आहे. जागा वाटपाच्या फॉर्मुल्यामध्ये देखील तिन्ही पक्षांनी आडेल तट्टूपणा बाजूला ठेवला पाहिजे.

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातील अंतर्गत वाद थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीचे बळ वाढलेला आहे. अशाच प्रकारे जर एकसंघ राहिले तर, पुन्हा एकदा महाविकास आघाडी राज्यामध्ये त्यांचे सरकार बनवू शकते - युवराज मोहिते, राजकीय विश्लेषक

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्यामुळे राज्यात त्यांची सत्ता येण्यासाठी निवडणुका लागण्याची वेळ पहावा लागणार आहे. तोपर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

  • हेही वाचा -

Uddhav Thackeray : न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

Mothers Day : समाजाने नाकारलेल्या अनाथ बालकांची "ती" बनली आई

Karnataka Result Banner : 'कर्नाटका तो झाकी है महाराष्ट्र अभि बाकी है'; राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.