मुंबई - राज्याच्या गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेल्या बदल्यांसदर्भात गृह सचिवांनी पोलीस अधिकाऱ्यांची बदलीसदंर्भात सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदली मध्ये होणारे सगळे गैरव्यवहार संदर्भात एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीच कारवाई न करता या सगळ्या पोलिसांच्या बदल्यांच्या मागे असणाऱ्या लोकांचे रक्षण केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही कारवाई नाही -
मी मुख्यमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात एक बातमी समोर आली होती. त्यावर आम्ही लक्ष ठेवत या सगळ्या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश इंटेलिजन्स युनिटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले होते. रश्मी शुक्ला यांनी या संदर्भात सगळी माहिती घेत संपूर्ण अहवाल तयार केला. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीने नंतर कॉल रेकॉर्डींग केले जावू लागले. त्यात काही मोठे अधिकारी, राजकीय लोक बाहेर आले. यानंतर हा अहवाल त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन डीजी सुबोध जैस्वाल यांना सुपूर्द केला होता. जैस्वाल यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही आणि तो अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवून दिला. २५-०८-२०२० त्यानंतर तो अहवाल मुख्य सचिव सिताराम कुंटेना दिला गेला होता, असे दावा फडणवीस यांनी केला.
हेही वाचा - अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही - बाळासाहेब थोरात
या सगळ्या प्रकरणामध्ये अहवाल तयार करणाऱ्या रश्मी शुक्ला यांची महाविकास आघाडी सरकारने बदली केली. त्यांच्या पदावरुन त्यांना दूर करण्यात आले. तसेच त्यांना अस्तित्वात नसलेले परंतु सरकारने एक नवीन पोस्ट बनवून त्यांना त्या पदावर ती बढती दिली. तसेच सुबोध जैस्वाल यांनीदेखील केंद्रात आयपीएस रँक मिळविला. त्यांनाही या सरकारने दाबले, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला.
गृह सचिवांची भेट घेणार -
तो संपूर्ण अहवाल आणि या सगळ्या पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातली माहिती माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातील आईपीएस रँकच्या अधिकाऱ्यांसोबत हे सरकार योग्य रीतीने वागत नाही. ज्यांची नावे या अहवालामध्ये आहेत. त्यांना त्याच ठिकाणी बदली मिळाल्या आहेत. ही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे. या सगळ्या संदर्भातली माहिती मी आज माहिती दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिव यांना देणार आहे. तसेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे सीबीआयद्वारे करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री आपला नाही ही भाजपची दुखरी नस, त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये'