ETV Bharat / state

वादग्रस्त राम कदम विजयी ठरणार का ? - Sanjay Bhalerao Ghatkopar News

२००९ साली राज ठाकरे यांच्या भाषणाच्या जोरावर व २०१४ साली मोदी लाटेवर आमदार झालेल्या राम कदम यांना २०१९ ची विधानसभा निवडणूक सोप्पी राहिली नाही.

राम कदम
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:54 PM IST

मुंबई- २००९ साली राज ठाकरे यांच्या भाषणाच्या जोरावर व २०१४ साली मोदी लाटेवर आमदार झालेल्या राम कदम यांना २०१९ ची विधानसभा निवडणूक सोपी राहिली नाही. यावेळी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि अपक्ष संजय भालेराव यांचे आव्हान असणार आहे.

घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

घाटकोपर पश्चिम मतदारसंघ मराठी बहुल म्हणून परिचित आहे. या विभागात दीड लाखाहून जास्त मतदार मराठी आहे. त्यात शिवसेनेचे काही कार्यकर्ते कदम यांच्या कार्यशैलीवर नाराज आहे. काही ठिकाणी शिवसैनिकांनी एकत्र येत कदम यांच्याविरोधात बॅनरबाजी सुद्धा केली होती.

शिवसेनेत असलेले संजय भालेराव हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी या मतदारसंघात सभा घेतली होती. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. आमच्याकडे होता तेव्हा राम होता आता भाजपमध्ये जाऊन रावण झाला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी कदम यांच्यावर केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्यांना तिकीट मिळतच कस ? असा प्रश्न देखील यावेळी राज यांनी उपस्थित केला होता. मात्र या भाषणाचा फायदा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होतो की अजून कोणाला हे मात्र २४ ऑक्टोबरलाच कळणार आहे.

या विधानसभेत पुनर्विकास, वाहतूक कोंडी, डोंगराळ भाग, शाळा, अशा अनेक समस्या आहेत. मात्र सध्याचे चित्र पाहिल्यास राम कदम विरुद्ध मनसेचे गणेश चुक्कल असा सामना येथे रंगणार आहे. काँग्रेसचे उमेदवार आनंद शुक्लाही या भागात आक्रमक प्रचार करत आहेत. मात्र त्यांना विजयासाठी चमत्काराची गरज आहे. दुसरीकडे अपक्ष संजय भालेराव यांचेही या भागात चांगले वजन आहे. याचा फटका कदम यांना बसण्याची शक्यता आहे. कदम यांना हरवणे इतके सोप्पे नाही कारण पक्षाशिवाय त्यांची स्वतःची प्रचार यंत्रणा, मोठा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यात विरोधकांनी चारही बाजूने राम कदम यांना घेरले आहे एवढे मात्र नक्की.

हेही वाचा- भाजपचा जाहीरनामा : पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार?

१० वर्षात काहीच विकास झाला नाही. अनेक मुद्दे प्रलंबित आहे. आणि आता घाटकोपरमध्ये रावण दहन करण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिमचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी सांगितले. यावेळेसही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. आमच्या सरकारने ५ वर्षात अनेक काम केले आहे. माझ्यावर कोणतीही नाराजी नाही. काही लोक अफवा पसरवत आहे, असे भाजपचे उमेदवार राम कदम यांनी सांगितले. या मतदारसंघात खूप कामे प्रलंबित आहे. आम्ही फक्त विकासावर मत मागणार आहोत. घराघरात जाऊन आम्ही आमची बाजू समजावून सांगत आहोत, असे काँग्रेसचे उमेदवार आनंद शुक्ला यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- पीएमसी बँक घोटाळा : तणावात असलेल्या आणखी एका बँक खातेदाराचा मृत्यू

Intro:मुंबई

2009 साली राज ठाकरे यांच्या भाषणाच्या जोरावर 2014 साली मोदी लाटेवर आमदार झालेल्या राम कदम यांना 2019 ची विधानसभा निवडणूक सोप्पी राहिली नाही आहे. यावेळी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि अपक्ष संजय भालेराव यांचे आव्हान असणार आहे.Body:घाटकोपर पश्चिम मतदारसंघ मराठी बहुल म्हणून परिचित आहे. या विभागात दीड लाखाहून जास्त मतदार मराठी आहे. त्यात शिवसेनेचे काही कार्यकर्ते ही कदम यांच्या कार्यशैलीवर नाराज आहे. काही ठिकाणी शिवसैनिक एकत्र येत कदम यांच्याविरोधात बॅनरबाजी सुद्धा केली होती.
शिवसेनेत असलेले संजय भालेराव हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी या मतदारसंघात सभा घेतली होती यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या कडे होता तेव्हा राम होता आता भाजपमध्ये जाऊन रावण झाला आहे अशी टीका राज ठाकरे यांनी कदम यांच्यावर केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्याना तिकीट मिळतच कस असा प्रश्न देखील यावेळी राज यांनी उपस्थित केला होता. मात्र या भाषणाचा फायदा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होतो की अजून कोणाला हे मात्र 24 ऑक्टोबरलाच कळणार आहे. या विधानसभेत पुनर्विकास, वाहतुक कोंडी, डोंगराळ भाग, शाळा असा अनेक समस्या आहेत. मात्र सध्याचे चित्र पाहिल्यास राम कदम विरुद्ध मनसेचे गणेश चुक्कल असा सामना येथे रंगणार आहे. काँग्रेसचे उमेदवार आनंद शुक्लाही या भागात आक्रमक प्रचार करत आहेत मात्र त्यांना विजयासाठी चमत्काराची गरज आहे. दुसरीकडे अपक्ष संजय भालेराव यांचेही या भागात चांगले वजन आहे याचा फटका कदम यांना बसण्याची शक्यता आहे. कदम यांना हरवणे इतके सोप्पे नाही कारण पक्षाशिवाय त्यांची स्वतःची प्रचार यंत्रणा, मोठा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र एवढ नक्की विरोधकांनी चार बाजूने राम कदम यांना घेरले आहे.

10 वर्षात काहीच विकास झाला नाही आहे. अनेक मुद्दे प्रलंबीत आहे. आणि आता घाटकोपरमध्ये रावण दहन करण्याची वेळ आली आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिमचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी सांगितले.

यावेळेसही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. आमच्या सरकारने 5 वर्षात अनेक काम केले आहे. माझ्यावर कोणतीही नाराजी नाही आहे. काही लोक अफवा पसरवत आहे भाजपचे उमेदवार राम कदम यांनी सांगितले.

या मतदारसंघात खूप कामे प्रलंबित आहे. आम्ही फक्त विकासावर मत मागणार आहोत. घराघरात जाऊन आम्ही आमची बाजू समजावून सांगत आहोत असे कॉंग्रेसचे उमेदवार आनंद शुक्ला यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.