ETV Bharat / state

नोटाबंदीने मोठा फटका बसला, विडी कामगारांनी मांडल्या समस्या - kurla

हजार विड्या वळल्यानंतर या महिलांना ३०० रुपये मिळतात. हे पैसे अगदीच तुटपुंजे आहेत. पण, हे काम मोठ्या जिकीरीचे आहे. तसेच, किचकट आहे. आधीच हा व्यवसाय संकटात होता. त्यातच सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे विडी व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे या महिला कामगारांचे मत आहे.

विडी कामगार महिला
author img

By

Published : Apr 15, 2019, 11:35 AM IST

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. मात्र, मुंबईतील कुर्ला भागातील विडी वळणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणीही फिरकला नाही. अशी खंत महिला व्यक्त करत आहेत. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने या विडी कामगार महिलांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपल्या समस्यांचा पाढा 'ईटीव्ही भारत'पुढे वाचला.

विडी कामगार महिलांनी आपल्या समस्या मांडल्या

मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कुर्ला पश्चिमलाल संभाजी चौक परिसरात विडी कामगार महिलांची वसाहत आहेत. आंध्रप्रदेशमधून साठ वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेली ही कुटुंबे छोटीमोठी कामे करुन रोजीरोटी भागवतात. या घरातील महिला विड्या वळण्याचे काम करतात. या व्यवसायातून त्यांच्या घराला हातभार लागतो. पण, आता हा व्यवसायही डबघाईला आला आहे. अतिशय तुटपुंजी कमाई मिळत असताना सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

हजार विड्या वळल्यानंतर या महिलांना ३०० रुपये मिळतात. हे पैसे अगदीच तुटपुंजे आहेत. पण, हे काम मोठ्या जिकीरीचे आहे. तसेच, किचकट आहे. आधीच हा व्यवसाय संकटात होता. त्यातच सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे विडी व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे या महिला कामगारांचे मत आहे. पण, असे असूनही कुणी नेता त्यांच्या भेटीला आला नाही.

काय म्हणतात विडी कामगार
येथील अनुराधा देवसाने सांगतात, की मागील २५ वर्षांपासून मी विड्या वळते. ३०० रुपये मिळण्यासाठी हजार विड्या वळाव्या लागतात. त्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते. त्यामुळे हवा तसा मोबदला मिळत नाही. दुसऱ्या विडी कामगार प्रमिला म्हणतात, माझी आई, आजी सुद्धा हेच काम करायच्या. पण, नोटाबंदीने आमच्यावर संकट कोसळले. तर वरलक्ष्मी म्हणतात, वीस वर्षांपासून मी विडी वळते. या विड्या आम्हाला परळला जाऊन विकाव्या लागतात. त्यामुळे जवळच विक्री केंद्र व्हावे अशी आमची मागणी आहे.

Intro:कुर्ल्यातील विडी कामगार महिलांच्या व्यथा कोणी लक्षात घेईना!

Body:कुर्ल्यातील विडी कामगार महिलांच्या व्यथा कोणी लक्षात घेईना!
'ईटीव्ही भारत'शी बोलताना अनेक महिलांनी सांगितले नोटबंदीने आमचा रोजगार गेला
मुंबई, ता. 14 :

मुंबईत चौथ्या टप्प्यातील लोकसभेसाठी मतदान होणार असून त्यासाठीचे वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघात स्थानिकांचे अनेक प्रश्न समोर येत असताना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कुर्ला पश्चिमेला असलेल्या संभाजी चौक परिसरातील विडी कामगार महिलांच्या व्यथाकडे लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष नसल्याचे समोर आहे.त्यामुळे या कामगार महिलांनी 'ईटीव्ही भारत'पुढे येऊन आपल्या व्यथा मांडल्या.

कुर्ला पश्चिमेला संभाजी चौक आणि त्या परिसरात सर्वम्मा चाळ ही विडी कामगार महिलसाठी प्रसिद्ध आहे. मागील चार दशकांपासून येथे विडी वळण्याची कामे ककरून आपली उपजीविका भागवणाऱ्या महिलांच्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या व्यथा मात्र अद्याप कायम आहेत. हजार विडी तयार केल्यास त्यांना 300 रुपयांचा मोबदला मिळतो. जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केल्यास कुठे तर एक-दीड हजार विडी तयार होतात, आणि त्यावरच या महिलांची उपजीविका चालते. मागील अनेक वर्षात, त्यांच्याकडे कोणता नेता आला नाही, आपले प्रश्न ऐकले नसल्याची खंत त्या व्यक्त करतात.

आंध्रप्रदेश या भागातून येऊन मागील सहा दशकापासून स्थायिक झालेल्या महिलांचा पारंपारिक व्यवसाय वळणे आणि त्यात तयार करून देणे हाच आहे मात्र नोटबंदी या काळानंतर या वेळी व्यवसायावर मोठे संकट कोसळले असून असंख्य महिलांच्या हातचा रोजगार निघून गेला आहे. अनेकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असतानाच त्यांच्या प्रश्न मात्र अद्यापही कुणी ऐकून घेत नाही अशी खंत येथील महिलांकडून व्यक्त केली जाते.

देवसाने अनुराधा या मागील पंचवीस वर्षापासून विडी वळण्याचे काम करतात. आता त्यांची दोन मुले मोठी झालीत. तीनशे रुपयाला एक हजार बिडी वळून द्यावे लागतात त्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते, परंतु त्या बदल्यात आम्हाला त्याचा म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. परंतु नाईलाज असल्याने आम्हाला हे काम करावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. तर प्रमिला म्हणाल्या सौम्या की, माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी हेच काम करतात. परंतु नोटाबंदीनंतर आमच्या कामावर संकट कोसळले. तर दुसरीकडे वरलक्षमी म्हणाल्या, वीस वर्षापासून मी ही विडी वळण्याचे काम करते,परंतु आम्हाला त्या बनवून परळला जाऊन द्याव्या लागतात आजूबाजूला कुठेतरी त्यासाठू केंद्र व्हावे अशी आमची मागणी आहे. आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, सरकार म्हणते, आम्हाला अनेक सवलती दिल्या जातात, परंतु एकही सवलत आमच्यापर्यंत पोहोचत नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून तरी त्या सवलती आम्हाला मिळाव्यात अशी मागणीही या वेळी कामगार महिलांकडून करण्यात आली.आम्हाला काय सवलती आहेत याचीच माहिती मिळत नसल्याचे पद्मावती, कल्पना, जया, ललिता आदी कामगार महिलांनीही यावेळी सांगितले. नोटाबंदीनंतर आमच्यावर संकट आले परंतु त्यासाठी कुठलाही सरकारी प्रतिनिधी अथवा राजकीय नेता आमच्या मदतीसाठी आला नाही अशी खंत या महिलांनी व्यक्त केली.

Conclusion:कुर्ल्यातील विडी कामगार महिलांच्या व्यथा कोणी लक्षात घेईना!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.