ETV Bharat / state

'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला'; मकर संक्रांत साजरी का करतात? जाणून घ्या इतिहास

Makar Sankranti २०२४ : वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या आदला दिवस भोगी म्हणून ओळखला जातो. घरोघरी भोगी निमित्त मिश्र भाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते.

Makar Sankranti 2024
मकर संक्रांत 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 9:30 PM IST

Updated : Jan 15, 2024, 8:11 AM IST

मुंबई Makar Sankranti २०२४ : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 15 जानेवारीला मकर संक्रांत हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढेच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र, या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. या सणाला तिळाचे विशेष महत्त्व असते. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात.

भोगीचे महत्व : संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.

काळ्या रंगाचेच कपडे का घालतात : या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासही विशेष महत्त्व असते. अनेकदा सणासुदीला काळा रंग वर्ज्य करण्यात येतो. मात्र, मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो. संक्रांती दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. तसेच या दिवशी हलव्याचे दागिनेही घालण्याची प्रथा आहे.

तिळवण आणि बोरन्हाण : नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयालाही देऊन त्यांंचं कौतुक केलं जातं. लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे आणि त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धती आहे. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामध्ये गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात.

तिळगुळाची देवाण घेवाण : संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळं अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

हेही वाचा -

  1. Kite Fesitval Thane : महागाईमुळे पतंग व्यवसायाला ग्रहण; ग्राहकांचा पतंग उडवण्याकडे कल कमी, विक्रेत्यांनी मांडली व्यथा
  2. PETA Chinese Manja Protest In Pune : मकरसंक्रांत...; अंगावर रक्ताचे डाग लावून चीनी मांजा न वापरण्याचे पेटा संस्थेकडून आवाहन
  3. Makar Sankranti Special : अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण मकर संक्रांत - पंडित वसंत गाडगीळ

Last Updated : Jan 15, 2024, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.