ETV Bharat / state

Supriya Sule: राष्ट्रवादीचा भावी मुख्यमंत्री कोण असेल? सुप्रिया सुळेंच्या तक्रारीनंतर चर्चांना उधाण

author img

By

Published : Feb 24, 2023, 10:58 AM IST

Updated : Feb 24, 2023, 12:58 PM IST

राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरून पोस्टरबाजी रंगली असल्याचे सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून महाराष्ट्रात एवढे राजकारण घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्यात मुख्यमंत्री कोण असणार यासाठीची रस्सीखेच होत असल्याचे गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या बॅनरबाजी नंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

future Chief Minister of NCP
भावी मुख्यमंत्री कोण असेल?
Supriya Sule
सुप्रिया सुळे पोस्टर

मुंबई: राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून मोठे राजकारण घडले आहे. मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून 25 वर्षाची भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा आरोप केला. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंद करून भाजपाशी युती करत स्वतः मुख्यमंत्री होत सर्वांनाच झटका दिला होता.

पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री: अजित पवार आणि जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालय बाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी झाली होती. आता खासदार सुप्रिया सुळे पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालाबाहेर अज्ञात्तांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदावरून मतभेद आहेत का? अशा चर्चांना उधाण आल आहे. बॅनरवर राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आल आहे. तसेच "नाद करायचा नाय असे देखील बॅनर वर लिहले आहे. यासोबतच सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावण्यात आलेला आहे.

मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी: गेल्या काही दिवसापासून सातत्याने राष्ट्रवादीचा भावी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याचा कारणही तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा 16 फेब्रुवारीच्या एक दिवस अगोदर मुंबईत त्यांच्या निवासस्थान असलेल्या नेपिएमसी रोडवर भावी मुख्यमंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांना पर्याय म्हणून जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत का ? अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र त्यानंतर लगेचच दोन दिवसाने अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयावर झळकले होते.

सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली: आता खुद्द सुप्रिया सुळे या राज्याच्या भावी मुख्यमंत्री असतील असे बॅनर प्रदेश कार्यालयाच्या बाहेर झळकल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा सुरू आहे का ? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या बॅनरबाजी नंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बॅनरबाजी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसात केली आहे. तसेच आपला आणि शरद पवार यांचा फोटो वापरायचा अधिकार कोणी दिला असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Kasba By Election कसबा पोटनिवडणुकीत मतदारांचे मन जिंकण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा पहा कोण काय म्हणाले

Last Updated : Feb 24, 2023, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.