मुंबई - राई, मुर्धे आणि मोरवा हे तीन गाव म्हणजे वीस हजार पेक्षा अधिक लोकसंख्या येथे निवास करते. या ठिकाणी आगरी कोळी भूमिपुत्र जनतेची लोकसंख्या बहुतांश आहे. जिथे हे शेतकरी शेती करतात. त्याच ठिकाणी मेट्रो लाईन 9 याचे कार शेड केले जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र विकास आघाडी शासनाच्या काळात जनतेच्या दबावामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात प्रश्न देखील उपस्थित केला होता. आणि तो संदर्भ घेऊन शेतकऱ्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना यावेळी अर्ज विनंती केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची 17 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर एम एम आर डी ए यांनी पुढील चार-पाच दिवसातच संबंधित परिसराचे सर्वेक्षण केले आहे.
हे सर्वेक्षण करताना एमएमआरडीए'चे अभियंते मंडळी देखील या गावाच्या परिसरात आले भेटी दिल्या शेतकऱ्यांशी बोलले सर्वेक्षण केले. मात्र, त्यानंतर जो मीरा-भाईंदरचा विकास आराखड्या संदर्भात शासनाने पत्र प्रसिद्ध केले. त्या पत्रात पुन्हा शेतजमिनीवरच मेट्रो लाईन नऊचे कार शेड असल्याचे त्यांना आढळले. तसेच त्यांना मीरा भाईंदर विकास आराखडाच्या प्रस्तावित नकाशामध्ये देखील ही बाब आढळली. तसेच, एकीकडे ९ नोव्हेम्बर पर्यंत विकास आराखडा बाबत हरकती नोंदवायच्यात. याचा अर्थ शेतजमिनीवर कारशेड होणार नाही हे आश्वासन फोल ठरले असे दिसत आहे. त्यामुळे आता एमएमआरडीकडून दहा-बारा दिवसांपूर्वी संबंधित जागेचे केलेले सर्वेक्षण आमच्यासाठी खुलं करावे' अशी मागणी त्यांनी केलेली आहे.
ही भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या जमिनी शेजारी दुसऱ्या अनेक खाजगी व सरकारी जमिनी असताना फक्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे आरक्षण टाकले असल्याची बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नजरेस त्यांनी 17 ऑक्टोबर बरोबर 11 दिवसांपूर्वी आणली. तसेच, खंत देखील व्यक्त केली होती. तरी देखील जनतेच्या व्यथा शासनांस कळवूनही शासन पुन्हा शेतजमीनवरच कारशेड करणार असेल तर शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांच्या संघटनेचे नेते अशोक पाटील यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले, "11 दिवसांपूर्वीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महसूल विभागाचे सचिव, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण विभागाची उच्च अधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले होते. मात्र, आज पंचवार्षिक मीरा-भाईंदर विकासाचा आराखडा सादर करत असताना या विकासा आराखड्यात प्रस्तावित केलेल्या नकाशात मेट्रो लाईन नऊ यासाठीचे कार शेड त्याच जागी आहे. जेथे शेकडो हजारो एकर जमिनीवर आगरी कोळी शेतकरी शेती करतात.
या सर्वेक्षणाचा संदर्भात नेमकी काय तक्रार किंवा मागणी आहे, असे विचारले असता अशोक पाटील यांनी उत्तरा दाखल ईटीव्ही भारतला माहिती दिली की ,"आम्हाला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावले. मात्र, आमची फसवणूक झाली. आम्हाला ते गाजर दाखवलं गेलं. हे आमच्या आता लक्षात आलं आहे. याचं कारण 28 ऑक्टोबर रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या पत्रात विकास नियोजन आराखड्यात आमच्या शेतजमिनीवरच कार शेड प्रस्तावित केलेले आहे. मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व विभागाचे उच्च अधिकारी यांच्यासोबत बैठकीनंतर आदेश दिला आणि जे सर्वेक्षण केलं ते सर्वेक्षण नेमकं काय आहे. ते आम्हाला समजले पाहिजे . नाही तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा देखील त्यांनी शासनाला दिला आहे. तर एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांच्यासोबत बोलणे केले असता, ते व्यस्त असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय आहे, ते समजले नाही. तसेच, एमएमआरडीए विभागाच्या जनसंपर्क विभागाकडे त्याबाबत विचारणा केल्यावर माहिती देण्यास वेळ लागेल. कारण जनसंपर्क अधिकारी चेतना माळी या सुटीवर आहेत अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त केली गेली आहे.