ETV Bharat / state

मालगाडीचा इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ हेती विस्कळीत - some issue in railway engine

पश्चिम रेल्वेवरील विरार ते वैतारणा दरम्यान सकाळच्या सुमारास एका मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे गुजरातच्या दिशेकडे जाणारी एक्स्प्रेस सेवा तर उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. परिणामी या घटनेमुळे पश्चिम रेल्वेला काही लोकल फेऱ्या रद्द करावे लागल्या आहे. ही घटना ऐन गर्दीच्या वेळी घडल्याने रेल्वे प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाला समोर जावे लागले आहेत.

रेल्वे
रेल्वे
author img

By

Published : Nov 2, 2021, 9:59 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील विरार ते वैतारणा दरम्यान सकाळच्या सुमारास एका मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे गुजरातच्या दिशेकडे जाणारी एक्स्प्रेस सेवा तर,उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. परिणामी या घटनेमुळे पश्चिम रेल्वेला काही लोकल फेऱ्या रद्द करावे लागल्या आहे. ही घटना ऐन गर्दीच्या वेळी घडल्याने रेल्वे प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाला समोर जावे लागले आहेत.

लोकल प्रवाशांचे प्रचंड हाल

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. 2 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेकडे जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच दुरुस्त करून मालगाडीला मार्गस्थ केले. मात्र, काही मिनिटांनी पुन्हा ही मालगाडी पुन्हा बंद पडली. त्यामुळे एकाच ठिकाणी लोकल आणि मेल एक्स्प्रेस बराच वेळ थांबल्याने प्रवासी देखील वैतागले होते. परिणामी विरार ते डहाणू रेल्वे मार्ग बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र, यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

या लोकल रेल्वे झाल्या होत्या रद्द

मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्या रद्द केल्या आहे. ज्यामध्ये सकाळी 7.38 वाजता अंधेरी ते डहाणू रोड जलद लोकल, सकाळी 8.12 वाजता चर्चगेट ते डहाणू रोड धीमी लोकल, सकाळी 8.50 वाजता चर्चगेट ते डहाणू रोड धीमी लोकल, सकाळी 10.31 बोरीवली ते डहाणू जलद लोकल, सकाळी 10.05 विरार ते डहाणू धीमी लोकल, सकाळी 11.10 विरार ते डहाणू धीमी लोकल, दुपारी 12.15 वाजता विरार ते डहाणू धीमी लोकल, दुपारी 1.20 वाजता विरार ते डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी 2.15 वाजता डहाणू रोड ते दादर जलद लोकल, दुपारी 3.20 वाजता डहाणू रोड ते दादर जलद लोकल, या सेवा रद्द करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा - 100 कोटी वसूली प्रकरण : अनिल देशमुखांनंतर आणखी मास्टर्स सापडायचे आहेत - भाजप खासदार मनोज कोटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.