ETV Bharat / state

स्वच्छता अभियानांतर्गत पश्चिम रेल्वेची 4 हजार जणांवर कारवाई; 109 टन कचरा काढला बाहेर

पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर गेली ६ महिने स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत त्यांनी कचरा करणाऱ्या ४ हजार प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईत रेल्वे प्रशासनातर्फे १०९ टन प्लास्टिक व कचराही उचलण्यात आला आहे. या सर्व कारवाईत रेल्वे प्रवाशांकडून तब्बल ७ लाख ६० हजार इतका दंड आकारण्यात आला.

पश्चिम रेल्वे
author img

By

Published : Oct 14, 2019, 5:07 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत ४ हजार प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल 109 टन प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढला गेला. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गांधी जयंती निमित्त राबवण्यात आली होती.

mumbai
रेल्वे कर्मचारी स्वच्छता आभियान राबवताना

पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर गेली ६ महिने स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत त्यांनी कचरा करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत देशातील स्वच्छता अभियानात महत्वपूर्ण योगदान दिले. या अभियानात रेल्वे प्रशासनाने १०९ टन प्लास्टिक आणि कचरा उचलेला आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी ४ हजार प्रवाशांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. या सर्व कारवाईत रेल्वे प्रवाशांकडून ७ लाख ६० हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.

रेल्वे स्वच्छता अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या उपक्रमांबाबत बोलताना कुमार डेवीज

हेही वाचा - ' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा'
पश्चिम रेल्वेतील स्वच्छता अभियानाअंतर्गत मुंबईतील सर्वात जास्त अस्वच्छता असलेल्या रेल्वे स्थानाकांपैकी एक माहिम स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. या स्थानकावर रेल्वे प्रशासनाने ३६ लोकांवर वेग-वेगळी कारवाई करत त्यांच्याकडून १५००० हजार रुपये दंड स्वरूपात आकारले आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
पश्चिम रेल्वेने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियानाची मोहीम पार पाडली. ही मोहीम महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान रेल्वे प्रशासनाने रेल्वे पटरी, रेल्वे स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छता गृह, लोकल रेल्वे मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोसायटी इत्यादी सर्व ठिकाणी अभियान राबवित स्वच्छता केली असल्याची माहिती कुमार डेवीज यांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबई : महिला रुग्णावरील बलात्कारप्रकरणी 58 वर्षीय डॉक्टरला अटक

Intro:पश्चिम रेल्वेत स्वच्छता अभियानांतर्गत चार हजार जणांवर कारवाई व 109 टन कचरा बाहेर काढला गेला

पश्चिम रेल्वेने गेल्या सहा महिने स्वच्छता अभियान रेल्वे मार्गावर राबविले होते त्यात त्यांनी कचरा करणाऱ्यावर मोठ्याप्रमाणात कारवाई केली आहे व देशातील स्वच्छता अभियानात महत्वपूर्ण योगदान दिले आहे .

या अभियानात रेल्वे प्रशासनाने १०९ टन प्यास्टिक व कचरा उचलेला आहे. रेल्वे प्रवासामध्ये जनजागृती होण्यासाठी ४हजार प्रवासीवर कारवाई करण्यात आलेली आहे.या सर्व रेल्वे प्रवासीकडून ७ लाख ६० हजार दंड आकारण्यात आलेले आहे.

वेस्टन रेल्वेतील स्वच्छता अभियाना अंतर्गत मुंबईत सर्वात जास्त अस्वच्छता असलेला रेल्वे स्थानाकापैकी एक स्थानक माहीम आहे.तर या स्थानकावर रेल्वे प्रशासनाने ३६ लोकांवर वेगळी कारवाई करून त्यांच्याकडून दंड १५०००हजार अकण्यात आलेले आहे.

पश्चिम रेल्वेने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर या दरम्यानही मोहीम पार पडली.महात्मा गांधी जयंती निमित्ताने ही मोहीम चालू केली होती. या मोहीममध्ये रेल्वे प्रशासनाने रेल्वे पटरी, रेल्वे स्वच्छता गृह, सर्वानीक स्वच्छता गृह, लोकल रेल्वे मध्ये, रेल्वे अधिकारीच्या सोसायटी या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे अशी माहिती कुमार डेवीज यांनी दिली आहे..

mh_mum_western_railway_swachhata_aabhiyan_01_7205017Body:MConclusion:M
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.