ETV Bharat / state

Holiday Special Trains : पश्चिम रेल्वेवर हॉलिडे स्‍पेशल ट्रेन वलसाड स्थानकावरही थांबणार - नागपूर ते मुंबई एकेरी विशेष ट्रेन

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने वलसाड स्थानकावर काही हॉलिडे स्पेशल गाड्यांना जादा थांबे देण्याचा निर्णय घेतला ( Holiday Special Trains Will Stop At Valsad Station ) आहे. त्यामुळे आता प्रवाशांची प्रावासाची चांगली सोय होणार आहे.

Holiday Special Trains
Holiday Special Trains
author img

By

Published : Oct 23, 2022, 10:13 AM IST

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने वलसाड स्थानकावर काही हॉलिडे स्पेशल गाड्यांना जादा थांबे देण्याचा निर्णय घेतला ( Holiday Special Trains Will Stop At Valsad Station ) आहे. पश्चिम रेल्वेचे वलसाड स्थानक यावर पुरविलेल्या गाड्यांचा तपशील आणि त्यांच्या थांबण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.

वांद्रे टर्मिनस - बारमेर विशेष ट्रेन : गाडी क्रमांक 09037/09038 वांद्रे टर्मिनस - बारमेर (साप्ताहिक) विशेष ट्रेन वलसाडला 22.22 वाजता पोहोचेल आणि 28 ऑक्टोबर2022 पासून 22.24 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे, 29 ऑक्टोबर 2022 पासून, ट्रेन क्रमांक 09038 बारमेर-वांद्रे टर्मिनस स्पेशल 12.50 वाजता वलसाडला पोहोचेल आणि 12.52 वाजता सुटेल.

मुंबई सेंट्रल - बनारस एसी स्पेशल : 26 ऑक्टोबर 2022 पासून ट्रेन क्रमांक 09183 मुंबई सेंट्रल - बनारस एसी स्पेशल वलसाडला 01.40 वाजता पोहोचेल आणि 01.42 वाजता निघेल. त्याचप्रमाणे, 28 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेन क्रमांक 09184 बनारस - मुंबई सेंट्रल एसी स्पेशल वलसाडला 00.35 वाजता पोहोचेल आणि 00.37 वाजता सुटेल.

वांद्रे टर्मिनस - अजमेर सुपरफास्ट स्पेशल : 26 ऑक्टोबर 2022 पासून ट्रेन क्रमांक 09039 वांद्रे टर्मिनस - अजमेर सुपरफास्ट स्पेशल वलसाडला 02.59 वाजता पोहोचेल आणि 03.01 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे, 27 ऑक्टोबर 2022 पासून, ट्रेन क्रमांक 09040 अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल 12.57 वाजता वलसाडला पोहोचेल आणि 12.59 वाजता सुटेल.

मुंबई सेंट्रल - काठगोदाम स्पेशल : 26 ऑक्टोबर 2022 पासून ट्रेन क्रमांक 09075 मुंबई सेंट्रल - काठगोदाम साप्ताहिक स्पेशल 13.45 वाजता वलसाडला पोहोचेल आणि 13.47 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे, 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेन क्रमांक 09076 काठगोदाम - मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल 17.50 वाजता वलसाडला पोहोचेल आणि 17.52 वाजता सुटेल.

वांद्रे टर्मिनस - इज्जतनगर विशेष : 23 ऑक्टोबर 2022 पासून, ट्रेन क्रमांक 09005 वांद्रे टर्मिनस - इज्जतनगर द्वि-साप्ताहिक विशेष वलसाडला 12.50 वाजता पोहोचेल आणि 12.52 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09006 इज्जतनगर - वांद्रे टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष वलसाड येथे 00.35 वाजता पोहोचेल आणि 24 ऑक्टोबर 2022 पासून 00.37 वाजता सुटेल. ट्रेनच्या तपशीलवार थांबा आणि वेळेसाठी, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी. पश्चिम रेल्वेच्या ( Western Railway ) जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी उक्त संकेतस्थळावर भेट देऊन माहिती ( Western Railway Holiday Special Trains ) घ्यावी.

नागपूर - मुंबई एकेरी विशेष ट्रेन : नागपूर ते मुंबई एकेरी विशेष ट्रेन सणांची गर्दी पाहून सुरू ( Nagpur to Mumbai one way special train ) होणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारून नागपूर ते मुंबई एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवणार आहे. त्याबाबतचा तपशील जाहिर होणार आहे. 01080 अतिजलद विशेष दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर इथे थांबे घाण्यात येणार आहेत. 01080 विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 19. ऑक्टोबर 2022 पासून आरक्षण सुरू करण्यात आले होते. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.