ETV Bharat / state

पश्चिम रेल्वेच्या ऐतिहासिक मुख्यालयाला १२५ वर्ष पूर्ण, काय आहे इमारतीचा इतिहास? - Headquarters Building

Western Railway News : मुंबईतील चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालय इमारतीला (Western Railway Headquarters Building) जानेवारी २०२४ मध्ये १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही भव्य इमारत पूर्वी बॉम्बे बडोदा आणि मध्य भारत रेल्वेचे मुख्यालय होते. १९५१ मध्ये येथे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय सुरु करण्यात आले होते.

Western Railway
पश्चिम रेल्वेच्या ऐतिहासिक मुख्यालयाला १२५ वर्ष पूर्ण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:46 PM IST

मुंबई Western Railway News : मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईत मध्य, पश्चिम, ट्रान्स हार्बर आणि हार्बर या मार्गावर रेल्वे लोकल धावते. रेल्वे लोकलमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट स्थानक येथे आहे. दरम्यान, आता यावर्षी २०२४ जानेवारी महिन्यात पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाला १२५ (Western Railway Headquarters Building) वर्षे पूर्ण होत आहे. पूर्वी ही भव्य आणि ऐतिहासिक इमारत बॉम्बे बडोदा आणि मध्य भारत रेल्वेचे मुख्यालय होते. मात्र यानंतर १९५१ मध्ये याठिकाणी म्हणजे चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय सुरु करण्यात आलं. यानिमित्तानं या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

इतिहास उलगडून सांगणारे प्रदर्शन : पश्चिम रेल्वेच्या या मुख्यालयाला १२५ वर्षे पूर्ण होत आहे. म्हणून या ऐतिहासिक प्रसंगी पश्चिम रेल्वे तसेच या मुख्यालयाचा इतिहास उलगडून सांगणारे तीन दिवस प्रदर्शन भरवलं जाणार आहे. ७ ते ९ जानेवारी २०२४ यादरम्यान, मुख्यालय लॉन्स या ठिकाणी इमारतीच्या समृद्ध भूतकाळ, गौरवशाली परंपरा आणि पश्चिम रेल्वेची माहिती सांगणारे हे प्रदर्शन असणार आहे. तसेच हेरिटेज गॅलरी, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इमारतीचा वारसा, सौंदर्य, नूतनीकरण आदीबाबत माहिती सांगणारे कार्यक्रम महिनाभर साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलीय.

१९५१ मध्ये पश्चिम रेल्वेची स्थापना : चर्चगेट येथील मुख्यालय इमारतीच्या बांधकामाचं काम १८९४ साली सुरू झालं आहे. जानेवारी १८९९ मध्ये पूर्ण झालं आहे. पूर्वी ही इमारत बॉम्बे बडोदा आणि मध्यभारत रेल्वेचे मुख्यालय होती. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर १९५१ मध्ये पश्चिम रेल्वेची स्थापना झाली. तेव्हापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय म्हणून या इमारतीत अविरतपणं काम सुरु आहे. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, मात्र ही इमारत डौलाने उभी आहे. ही इमारत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. दोन ब्रिटिश वास्तुविशारद जॉन केनडी आणि पॅट्रीक फ्रेंच यांनी या इमारतीचं काम पूर्ण केलं आहे.

हेही वाचा -

  1. Western Railway : पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरूच; २३३ लोकल रद्द, तर ८३ लोकल प्रवासी सेवेत
  2. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वार्षिक ठळक घडामोडींचा आढावा; घ्या जाणून
  3. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांसाठी चालवणार आठ विशेष 'लोकल रेल्वे'

प्रतिक्रिया देताना मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.