मुंबई: सायन परिसरात राहणाऱ्या युवतीची फेसबुकवरून एका तरुणासोबत तयार झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मध्ये तरुणीला शिवसेना कार्यालयात तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर आसिफ ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तिने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहिले. लग्नाची तारीखही ठरली. मात्र, लग्नाच्या तारखेलाच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
मुलानेच केली होती लग्नाची मागणी: सायन परिसरात तक्रारदार 25 वर्षीय तरुणी आजीसोबत राहते. 2019 मध्ये तिची आसिफ नावाच्या तरुणासोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग वाढले. नंतर मोबाईल नंबर एकमेकांना देऊन त्याद्वारे संपर्क वाढला. त्याने तिला प्रेमाची गळ घातली. तरुणीनेही त्याला होकार दिला. दोघेही वडाळ्यात भेटले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि आसिफने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली.
तरुणीची पोलिसात तक्रार: दोघांमध्ये चार वर्षे चांगले प्रेम संबंध होते. त्यानंतर मात्र जानेवारी 2023 मध्ये तरुणीला शिवसेना कार्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर आसिफ तिला टाळू लागला. त्याने तिला लग्नासाठी नकार कळवला. तिने त्याची मनधरणी करून लग्नाबद्दल घरी बोलणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याने मला थोडा वेळ हवा आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलतो असे तिला सांगितले; मात्र दोघांमधील वाद वाढू लागले. असिफच्या वडिलांचे बोलणे झाल्यानंतर तो लग्नाला तयार झाला. न्यायालयात जाऊन लग्नासाठी 1 मे तारीख निश्चित केली. ठरल्याप्रमाणे लग्नाचे स्वप्न रंगवत असताना 1 मे ला आसिफ लग्नासाठी नकार कळवत नॉट रिचेबल झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच पीडित तरुणीने वडाळा टी.टी.पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे.
आरोपीला पकडण्याचे पोलिसांचे आश्वासन: दरम्यान, आरोपीला लवकर पकडू अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यासाठी पोलिसांनी खास पथके नेमलेली असे. त्यांच्यात जवळीक वाढली.
हेही वाचा: 3 Worker Died In Fire : मंडपाच्या गोडावूनला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगार जळून खाक, आगीत चार सिलेंडर फुटले