ETV Bharat / state

Weather Update Today : कुठं ऊन, कुठं पाऊस, काही ठिकाणी अलर्ट जारी; पाहा तुमच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती

Weather Update Today : राज्यात दमदार आगमन झाल्यानंतर पावसानं दडी मारली होती. आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. आज हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकण किनारपट्टींसह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update Today
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 11:35 AM IST

मुंबई : हवामान विभागानं आज मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्राच्या काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची ( Heavy Rain ) शक्यता आहे. हवामान खात्यानं सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि अहमदनगरसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरला यलो अलर्ट : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाजानुसार, नागपूर, गोंदिया, भंडारा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर इथं काही ठिकाणी आणि चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ इथं काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा इथं तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस : मुंबई आणि आसपासच्या परिसरात मान्सूनचं पुनरागमन झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासह महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 ते 48 तासात मुंबई आणि आसपासच्या परिसरात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ : महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील तलावाची पातळी आता 97.09 टक्के आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 14,05,190 दशलक्ष लिटर किंवा 97.09 टक्के इतका आहे. सततच्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावाची पाणी पातळी कमी आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Weather : पाऊस पुन्हा सक्रिय; महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट'
  2. Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.