ETV Bharat / state

Weather Today:  मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईत विविध घटनांत दहा जणांचा मृत्यू, 3 जिल्ह्यांना आयएमडीचा ऑरेंज अलर्ट - मुंबई मान्सून अपडेट

आज हवामान कसे राहणार आहे, याविषयी भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Weather Today
हवामान विभागाचा अंदाज
author img

By

Published : Jun 30, 2023, 7:34 AM IST

Updated : Jun 30, 2023, 11:06 AM IST

मुंबई: पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतील विविध उपनगरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. गेल्या 48 तासात मुंबईत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उशिरा आलेल्या मान्सूने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. 24 ते 29 जून दरम्यान आतापर्यंत नोंदलेल्या पावसापैकी मुंबईत 95 टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याचे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) आकडेवारीवरून दिसत आहे.

रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. मुंबईसह उपनगरात पाऊसचा जोर वाढला आहे. मुंबईत वेस्टर्ट महमार्गावर मोठी कोंडी झाली आहे. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अंधेरीत सबवे वाहतुकीसाठी बंद झाला आहे. अंधेरी, मालाड व कांदिवली मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली आहे. जगबुडी नदीने ५.५ मीटर ही धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीच आयएमडीने यलो अलर्ट दिला आहे.

  • Maharashtra | Orange alert issued for six districts today and three districts tomorrow

    Yellow alert issued for seven districts today, five districts - including Mumbai and Thane - tomorrow, three districts on 1st July, four on 2nd July and four on 3rd July. pic.twitter.com/EdqwcVy4n5

    — ANI (@ANI) June 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पावसाने तीन जणांचा मृत्यू: मुंबईत गुरुवारी घरांची इमारत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. स्लॅब कोसळल्याने गुरुवारी एका 35 वर्षीय पुरुषाचा आणि दुसऱ्या घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टीत ही घटना दुपारी साडेचार वाजता घडली आहे. लाकडी माचीवर आदळल्याने दीड वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला. या चिमुकल्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु चिमुकल्याचा मृत्यू झाला. कांदिवलीच्या पश्चिम उपनगरात रात्री 9.30 वाजताच्या सुमारास किशन धुल्ला नावाचा 35 वर्षीय व्यक्ती त्याच्या घराचा बाथरूमचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला.

सरासरीहून कमी पावासाची नोंद- गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असला तरी सरासरीहून पाऊस कमी आहे.दक्षिण मुंबईत सरासरी 542.3 मिमी पाऊस होतो. यावर्षी 395 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी 24 ते 29 जून दरम्यान 371.4 मिमी पाऊस झाला आहे. सांताक्रूझमध्ये जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस ५३७.१ मिमी होतो. यावर्षी 1 ते 29 जून या कालावधीत 502.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात 24 ते 29 जून दरम्यान झालेल्या 485 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नैऋत्य मान्सून नेहमी 11 जूनला मुंबईत येतो. यंदा 25 जून रोजी मुंबईत मान्सूनचे आगमन झाला आहे. येत्या 5 दिवसांत कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाची शक्यता आहे पुढील 2 दिवसात गुजरात राज्य. कोकण आणि गुजरातमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाचे प्रमाण वाढत असताना झाडाखाली थांबणे टाळणे, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी शिस्त बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा-

  1. Heavy Rain : भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला
  2. Mahabaleshwar Rain : महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Last Updated : Jun 30, 2023, 11:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.