ETV Bharat / state

राणीच्या बागेत सुरू होणार प्राण्यांचे प्रजनन केंद्र - आदित्य ठाकरे

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) प्राण्यांचे प्रजनन केंद्र आणि रेस्क्यू केलेल्या प्राण्यांचे केंद्र सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

राणीची बाग
राणीची बाग
author img

By

Published : Jan 26, 2020, 6:12 PM IST

मुंबई - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) आतापर्यंत प्राण्यांचे फक्त संवर्धन केले जात होते. आता राणीच्या बागेत प्राण्यांचे प्रजनन केंद्र आणि रेस्क्यू केलेल्या प्राण्यांचे पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राणीच्या बागेत 'मुक्त पक्षी विहार' दालन आणि प्राण्यांच्या अत्याधुनिक दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.

प्राणी आणि पक्ष्यांच्या अत्याधुनिक दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले

दोन वर्षांपूर्वी पेंग्विन आणले होते. त्यानंतर दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त पर्यटक राणीच्या बागेत येऊ लागले आहेत. बागेच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना नैसर्गिक अधिवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना प्राणी पाहता यावेत यासाठी पिंजऱ्यांऐवजी काचेच्या भिंती लावण्यात आल्या आहेत. बागेत आत्तापर्यंत प्राण्यांचे संवर्धन केले जात होते. यापुढे प्राण्यांचे प्रजनन करू शकतो का? बचाव केलेल्या प्राण्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करता येईल का? याचा विचार सुरू आहे. त्यासाठी लवकरच प्रजनन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे, असे आदित्य यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री

बागेत पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. पेंग्विनच्या मृत्यूनंतर विरोधकांनी टीका केली होती. मात्र, आत्ता राणीच्या बागेत ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्यातील अर्ध्या जरी विरोधकांनी करुन दाखवल्या तर मी त्यांचे आभार मानेल, असा टोला आदित्य ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

Intro:मुंबई - मुंबईच्या राणीबागेत आता पर्यंत प्राण्यांचे संवर्धन केले जायचे. आता राणीबागेत प्रजनन केंद्र आणि रेस्क्यू केलेल्या प्राण्यांचे केंद्र सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील ५ मजली भव्यदिव्य असे 'मुक्त पक्षी विहार' दालन आणि बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांच्यासाठी काचेच्या भिंती असणाऱ्या अत्याधुनिक दालनांचे लोकार्पण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हि माहिती दिली. Body:यावेळी बोलताना दोन वर्षापूर्वी पेंग्विन आणले त्यानंतर दरदिवशी ३० हजाराहून अधिक पर्यटक राणीबागेत येत आहेत. राणीबागेत आम्ही बदल करत आहोत. प्राणी संग्रहालय म्हटले की लोकांना पिंजऱ्यातील प्राणी आठवतात. मात्र आता प्राण्यांना नैसर्गिक सहवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना त्यांना पाहता यावे म्हणून काचेच्या भिंती लावण्यात आल्या आहेत. राणीबागेत आतापर्यंत प्राण्यांचे संवर्धन केले जात होते. पुढे प्राण्यांचे प्रजनन करू शकतो का, बचाव केल्या प्रांत्यांसाठी याठिकाणी पुनर्वसन करता येऊ शकते का याचा विचार सुरु असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राणीबागेला बॉटनिकल गार्डन म्हणून ओळख आहे. देशभरात जे वृक्ष आणि वनस्पती मिळत नाही ते या ठिकाणी आहेत. आज तरस, बिबट्या, अस्वल आणि पक्षांसाठी उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. नव्या प्राण्यांना पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात नेहमीच काही तारिक चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो असे आदित्य म्हणाले. पेंग्विन आल्या नंतर राणीबागेतील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पेंग्विनच्या मृत्यूनंतर विरोधकांनी टिका केली होती. आत जे काही झाले आहे त्याच्या अर्धे जरी विरोधकांनी केले तर मी त्यांचे आभार मानेन असा टोला त्यांनी लगावला.

बातमीसाठी आदित्य ठाकरे यांचा बाईट आणि लोकार्पणाचे vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.