ETV Bharat / state

'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची खात्री केली जात आहे; आरोग्य मंत्र्यांची माहिती

author img

By

Published : Mar 17, 2020, 2:40 PM IST

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला का? याची खात्री केली जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Corona Virus News
कोरोना विषाणू न्यूज

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला का? याची खात्री केली जात असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला हे कोडे आद्यपही उलगडलेले नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कस्तुरबातील रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची खात्री केली जात आहे

दुबईहून भारतात आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा आज(मंगळवार) सकाळी 7 वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली होती. मात्र, या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झाला की, पूर्व आजारामुळे याची खात्री केली जात आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन..

ही व्यक्ती ५ मार्चला दुबईहून भारतात आली होती. तिला ७ मार्चला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तिवर श्वसनासंबंधीच्या आजारांचे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कस्तुरबा मध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला आहे. मृताची पत्नी आणि मुलगा या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.