मुंबई - शहरात उन्हाळ्यामुळे पाणी कपात सुरू असतानाच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सायन अॅटॉप हिल परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. ही माहिती पालिकेच्या जलविभागाला मिळताच तत्काळ पाणीपुरवठा बंद केला. शनिवारी दिवसभर हे काम पूर्ण करण्यात आले. रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले.
सायन अँटॉप हिल येथील मोनो स्थानक व सारस्वत बँकेजवळील पाण्याची पाईपलाईन शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुटली. मात्र, तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. अँटॉप हिल, सायन कोळीवाडा, वडाळा पश्चिम, सीजीएस कॉलनी आदी परिसरात पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झाला. पाणी पूर्ववत करण्यासाठी पालिकेच्या जल विभागाने पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. शनिवारी सकाळपर्यंत काम दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. यामुळे नागरिकांचे हाल झाले. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने धरणे आटू लागली आहेत. धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन पालिकेने १० टक्के कपात लागू केली. मात्र, पाईप लाईन फुटल्याने त्यात अधिक पडली असून नागरिकांना पाण्याचा वणवण भटकावे लागणार आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जलविभागाने दिली.