ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळेच जलमय झाली मुंबई, पालिका आयुक्तांचे पावसावर खापर - मुसळधार पावसानेच मुंबई तुंबली

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री पासून सुरू झालेल्या या पावासामुळे मुंबईच्या बहुतांश भागात पाणी साठले आहे. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या त्यावेळी अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले असल्याचा दावा केला आहे.

Local train services were affected
मुंबईतील पाणी साठलेल्या भागाची पाहणी करताना आयुक्त
author img

By

Published : Sep 23, 2020, 1:51 PM IST

मुंबई - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पाणी साचलेल्या भागात भेट दिली. या भेटीदरम्यान मुसळधार पाऊस पडल्यानेच मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले अल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे. मात्र, थोड्याशा पावसातही मुंबईची तुंबई होत असताना आयुक्त असे वक्तव्य करत असतील तर मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार? असा प्रश्न मुंबईकारांकडून विचारला जात आहे.

पावसामुळेच जलमय झाली मुंबई

भारतीय हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी रात्रीपासून मूलसळधार पाऊस पडला. गेल्या २४ तासात शहरात २६७.६२, पूर्व उपनगरात १७३.२२ तर पश्चिम उपनगरात २५१.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने शहरात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सायन कुर्ला, चुनभट्टी, मस्जिद स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सीएसएमटी ठाणे आणि सीएसएमटी वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दादर हिंदमाता, किंग सर्कल, सायन रोड नंबर २४, मालाड सबवे, वांद्रे टॉकीज, शास्त्री नगर गोरेगाव, अंधेरी सबवे, भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील रस्ते आणि बेस्ट वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी मुंबईतील जनजीवन ठप्प झाले आहे.

हवामान विभागाने मुंबईत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज २३ सप्टेंबर रोजी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

मुंबईत सुट्टी जाहिर केल्यानंतर पालिका आयुक्तांनी शहरात पाणी साचलेल्या विभागाची तसेच पाण्याचा निचरा करणाऱ्या पम्पिंग स्टेशनची पाहणी केली. मंगळवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळेच मुंबईत पाणी साचले आहे. शहरात नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे. नालेसफाई झाली नसती तर पावसाळ्यात सुरुवातीला म्हणजेच जून जुलै मध्येच पाणी साचले असते. त्यामुळे नालेसफाईशी पाणी साचल्याचा संबंध योग्य नसल्याचे चहल यांनी म्हटले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर काम करत आहेत. सकाळपासून पाऊस कमी झाल्याने पाण्याचा निचरा लवकर होईल, असे चहल म्हणाले.

बेस्टची वाहतूक वळवली -
-उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
-भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
-सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
-मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम
- लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
- भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
-जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.