ETV Bharat / state

मुंबईत पाणीबाणी : भातसा, अप्पर वैतरणातून राखीव साठ्याचा वापर सुरू - Ajeykumar Jadhav

जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त २० दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे. यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांच्या राखीव साठ्यातून मुंबईकरांची तहान भागविली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगपालिका
author img

By

Published : Jun 27, 2019, 10:17 AM IST

मुंबई - जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात झाली नाही. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा संपत आला आहे. तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढत चालली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी रोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे, आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी पाणीसाठा कमी झाल्यामुळे पालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत पावसाची हजेरी लागते. मात्र, यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यांपर्यंतही पावसाचा पत्ताच नसल्याने पाणीपुरवठा करताना पालिका चिंतेत पडली आहे. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये फक्त ७३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून राखीव साठ्याचे पाणी पालिकेला घ्यावे लागते आहे. पालिकेच्या पाच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा हा जुलैपर्यंतच पुरणारा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती. ती सरकारकडून देण्यात आली आहे. भातसामधून २ हजार दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणातून ५०० दशलक्ष लिटर पाणी पालिका दररोज उचलत आहे. म्हणजे मुंबईला दररोज पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ३५०० दशलक्ष लिटर पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी सध्या भातसा आणि अप्पर वैतरणातून घ्यावे लागते आहे.

तलावक्षेत्रात पावसाचे आगमन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाचे आगमन झाले असल्याची मुंबईकरांना खुशखबर आहे. एक जूनपासून अप्पर वैतरणा तलावक्षेत्रात ६६ मिमी, मोडकसागर ८६ मिमी, तानसा ६६ मिमी, विहार १६६ मिमी, तुळशी २८२ मिमी, भातसा ५८ मिमी आणि मध्य वैतरणा ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून जमिनीत पाणी झिरपण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर हे पाणी तलावांच्या दिशेने येत असल्याने तलावांपर्यंत पाणी येण्यास काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पिण्यायोग्य पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मध्य वैतरणा ०० (राखीव साठ्याचा वापर)
मोडकसागर ३४ हजार ३६४
तानसा २९ हजार ५३०
विहार १ हजार १९८
तुळशी १ हजार ९६०
भातसा ०० (राखीव साठ्याचा वापर)
मध्य वैतरणा ३३ हजार ४८०

Intro:मुंबई -
जून महिना संपत आला तरी पावसाला सुरूवात न झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा संपत आला आहे. तलावांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढत चालली आहे. सद्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त वीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा या या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी रोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे.Body:मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी पाणीसाठा कमी असल्यामुळे पालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची हजेरी लागते. यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंतही पावसाचा पत्ताच नसल्याने पाणी पुरवठा करताना पालिका चिंतेत पडली आहे. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये फक्त ७३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून राखीव साठ्याचे पाणी पालिकेला घ्यावे लागते आहे. पालिकेच्या पाच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा हा जुलैपर्यंतच पुरणारा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती. ती सरकारकडून देण्यात आली आहे. भातसामधून दोन हजार दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणातून ५०० दशलक्ष लिटर पाणी पालिका दररोज उचलत आहे. म्हणजे मुंबईला दररोज पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ३५०० दशलक्ष लिटर पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी सध्या भातसा आणि अप्पर वैतरणातून घ्यावे लागते आहे.

तलावक्षेत्रात पावसाचे आगमन - -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पावसाचे आगमन झाले असल्याची मुंबईकरांना खुशखबर आहे. एक जूनपासून अप्पर वैतरणा तलावक्षेत्रात ६६ मिमी, मोडकसागर ८६ मिमी, तानसा ६६ मिमी, विहार १६६ मिमी, तुळशी २८२ मिमी, भातसा ५८ मिमी आणि मध्य वैतरणा ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून जमिनीत पाणी झिरपण्यास पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर हे पाणी तलावांच्या दिशेने येत असल्याने तलावांपर्यंत पाणी येण्यास काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पिण्यायोग्य पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) -
मध्य वैतरणा ० (राखीव साठ्याचा वापर)
मोडकसागर ३४३६४
तानसा २९५३०
विहार ११९८
तुळशी १९६०
भातसा ० (राखीव साठ्याचा वापर)
मध्य वैतरणा ३३४८०

बातमीसाठी मुंबई महापालिकेचा फोटो किंवा vis वापरावेतConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.