मुंबई - मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भांडुप येथील 10 बाय 15 च्या घरात राहणाऱ्या भाग्यश्री गावडेला दहावीच्या परीक्षेमध्ये 98.80 टक्के मिळाले आहेत. तिच्या या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाग्यश्री ते 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण भांडुपमधील अमोर कोर विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. ती सध्या भांडुपकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. भाग्यश्रीचे वडील वांद्रे येथील सारस्वत बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. हनुमान नगर येथे दहा बाय पंधराच्या छोट्या खोलीत भाग्यश्री तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ राहतात.
अतिशय कठीण परिस्थितीत तिने प्रचंड मेहनत घेऊन हे यश मिळविल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाग्यश्रीने दहावीचा अभ्यास दिवसभर शाळा त्यानंतर खासगी क्लासेस आणि रात्री ५ ते ६ तास अभ्यास केला. तिच्या या प्रचंड मेहनतीला कुटुंबाने ही मोठे सहकार्य केले. भाग्यश्रीचा आवडता विषय गणित असून तिने गणितात दहावीला ९८ गुण मिळविले आहेत. तिला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असून, तिची भविष्यात प्राध्यापक होण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण भांडुपकरांसह, अमर कोर शाळेतील शिक्षक आणि कुटुंबाने ही कौतुक केले आहे.
मी केलेल्या अभ्यासाचे मला या टक्क्यांच्या रूपातून फळ मिळाले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर हा आनंद मित्र व नातेवाईकांबरोबर वाटता नाही आला. मात्र, ज्यांनी मला घडवलं त्या आई वडिलांबरोबर हा आनंद साजरा केला आहे. भविष्यात मला प्राध्यापक बनायचे आहे असे भाग्यश्नीने सांगितले.