ETV Bharat / state

Red Alert For Mumbai : मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Heavy rain warning in the state for 5 days

आजपासून पुढील चार दिवस मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी केले आहे.

Red Alert For Mumbai
Red Alert For Mumbai
author img

By

Published : Jul 19, 2023, 8:01 PM IST

डॉ. सुषमा नायर माहिती देतांना

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने आजपासून पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20-22 जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टी (115.6 मिमी-204.4 मिमी) होण्याची शक्यता आहे.

पुराचे पाणी रेल्वे ट्रकवर : कल्याणमधील मध्य रेल्वेच्या मार्गात पॉईंट बिघाड झाला आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर विभागादरम्यान पुराचे पाणी रेल्वे ट्रकवर आल्याने मध्य रेल्वेवरील अनेक गाड्या ठाणे आणि डोंबिवलीपर्यंतच चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासोबतच पनवेल येथे 'पॉइंट बिघाड' झाल्याने पनवेल-बेलापूर हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सकाळी 9.40 वाजता प्रभावित झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बेलापूर मार्गावर रेल्वे सेवा सुरू असताना, मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या 10-15 मिनिटे उशिराने धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Chief Minister office tweet
मुख्यमंत्री कार्यलयाचे ट्विट

आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

चार दिवस मुसळधार : या संदर्भात माहिती देताना भारतीय हवामान विभागाच्या डॉ. सुषमा नायर यांनी सांगितले की, "आम्ही मंगळवारी देखील रायगडला रेड अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे आज रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे चार दिवस रायगड, ठाणे, कोकण, पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग आहेत. त्यामुळे येथे मुसळधार होणार पाऊस होण्याची शक्यता आहे."

हेही वाचा - Heavy Rains In Satara : आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर आले पुराचे पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.