ETV Bharat / state

आरे वृक्षतोड प्रकरणी शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे - संजय निरुपम

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील 2700 झाडे तोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौक आणि पिकनिक पॉईंट येथे आज मुंबई काँग्रेसच्या वतीने जुन्या वृक्षांचे वृक्षपूजन करण्यात आले. यावेळी, संजय निरुपम यांनी वृक्षतोडीला विरोध करत असल्याचा केवळ दिखावा करत असल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे. आमचा मेट्रोला विरोध नसून झाडे तोडण्याला विरोध असल्याचेही संजय निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरे कॉलनीत संजय निरुपम यांनी केल वृक्षपूजन
author img

By

Published : Sep 15, 2019, 5:13 PM IST

Updated : Sep 15, 2019, 6:18 PM IST

मुंबई - मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील 2700 झाडे तोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौक आणि पिकनिक पॉईंट येथे आज मुंबई काँग्रेसच्या वतीने जुन्या वृक्षांचे वृक्षपूजन करण्यात आले. यावेळी, संजय निरुपम यांनी वृक्षतोडीला विरोध करत असल्याचा केवळ दिखावा करत असल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे.

आरे कॉलनीत संजय निरुपम यांनी केल वृक्षपूजन

निरूपम म्हणाले, शिवसेनेना केंद्रात सत्तेत आहे. महापौरही सेनेचाच आहे. एकीकडे आरे कारशेड प्रस्तावित विकास आराखड्यावर तुम्ही मोहर लावता आणि दुसरीकडे झाडे तोडण्याचा प्रस्ताव आला की विरोध करता. खरच शिवसेना कारशेड विरोधात आहे तर त्यांनी सरकार मधून बाहेर पडावे. भाजप बरोबर संबंध तोडून निवडणूका लढवावी. नाहीतर सेनेची भूमिका आम्ही दिखावाच समजू.
उपस्थितांनी यावेळी 'कारशेड हटाव, आरे बचाव' च्या घोषणा दिल्या. आमचा मेट्रोला विरोध नसून झाडे तोडण्याला विरोध असल्याचे संजय निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केले. आरेला वाचवून येथे येणाऱ्या बिल्डर लॉबीला हटवण्याचे काम मुंबई काँग्रेस करणार असल्याचेही निरुपम म्हणाले.

हेही वाचा - 'आरे'तच मेट्रोचे कारशेड करण्यावर पालिका आयुक्तही ठाम

यावेळी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच, आरेतील आदिवासी पाड्यांतील नागरिक, सेव्ह आरे संस्थेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:मुंबई - मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील 2700 झाडे तोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौक, पिकनिक पॉईंट येथे आज मुंबई काँग्रेसच्या वतीने वृक्षपूजन करण्यात आले. रीतसर भटजी बोलावून सर्वात जुन्या वृक्षाची पूजा करण्यात आली.Body:यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, वर्षा गायकवाड, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. याव्यतिरिक्त आरेतील आदिवासी पाड्यांतील नागरिक, सेव्ह आरे संस्थेचे कार्यकर्ते व या विभागात राहणारे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Conclusion:यावेळी कारशेड हटाव आरे बचावच्या घोषणा देण्यात आल्या. झाड तोडण्याला विरोध असून आमचा मेट्रोला विरोध नसल्याचे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले. आज आम्ही वृक्षपूजन करून आरे वाचवा मोहिमेला सुरुवात केली आहे. आरेला वाचवून येथे येणाऱ्या बिल्डर लॉबीला हटवण्याच काम मुंबई काँग्रेस करणार असल्याचे निरुपम म्हणाले.
Last Updated : Sep 15, 2019, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.