ETV Bharat / state

Teacher Graduate Election Voting : वादळी घडामोडीनंतर शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान

विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्ये जे घमासान सुरू असते तसेच, घमासान यावेळी शिक्षक, पदवीधर निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राला पाहायाला मिळाले आहे. आज सोमवार (दि. 30 जानेवारी)रोजी या निवडणुका होत आहेत. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि नाशिक विभागात निवडणुका होत आहेत. मात्र, यामध्ये नाशिकबाबत ज्या वादळी घडामोडी घडल्या त्या काही वेगळ्याच घडल्या आहेत.

Vidhan Bhavan
विधान भवन
author img

By

Published : Jan 30, 2023, 12:11 AM IST

मुंबई : निवडणुका म्हटल की चर्चा आणि उलट-सुलट चर्चांचा फड रंगतो. यामध्ये कोण कुणावर कधी कुरघोडी करेल याचा नेम नाही. सध्या विधानपरिषद पदवीधरच्या निवडणुकांचे वारे वाहत होते. आज पदवीधर निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मात्र, या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हापासून ज्या घडामोडी घडल्यात त्या वादळापेक्षा काही कमी नाहीत. दोन कट्टर राष्ट्रीय विरोधी पक्षांचे अधिकृत उमेदवार नसलेली ही निवडणुक होत आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि नाशिक विभागात निवडणुका होत आहेत. मात्र, यामध्ये नाशिकबाबत ज्या वादळी घडामोडी घडल्या त्या काही वेगळ्याच राहिल्या. आज मतदान होत असून लवकरच कुणी कुणाचा गेम केला हे कळणार आहे.

अमरावती विभाग : जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके साहित्य, मतपेट्यांसह कालच दाखल झाली असून, सर्व पथकांनी आपापली जबाबदारी समजून घेत, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनूसार काम सुरु केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती विभागात 1 लाख 34 हजार 14 पुरूष, 72 हजार 141 महिला व इतर 17 असे एकूण 2 लाख 06 हजार 172 मतदारांची नोंदणी झालेली आहे.

सर्वाधिक ७५ मतदान केंद्र अमरावती जिल्ह्यात‎ : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात विभागलेल्या मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ७५‎ मतदान केंद्र अमरावती जिल्ह्यात असून सर्वात कमी २६ वाशीममध्ये आहेत. अंतिम‎ मतदार यादीनुसार, अमरावती विभागात २ लाख ६ हजार १७२ मतदार आहेत. अमरावती‎ जिल्ह्यात ६४ हजार ३४४, अकोल्यात ५० हजार ६०६, बुलडाण्यात ३७ हजार ८९४,‎ वाशीममध्ये १८ हजार ५० तर यवतमाळ जिल्ह्यात ३५ हजार २७८ मतदारांची नोंदणी झाली‎ आहे. अकोला जिल्ह्यात ६१, बुलडाणा जिल्ह्यात ५२ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे‎ आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी २८८ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार १५३ मतदान अधिकारी‎ आणि २८९ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे.‎

पोलीस बंदोबस्तात पथके : सर्व व्यवस्थित पोलीस बंदोबस्तात पथक रवानानिवडणूक साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले. त्यांचे विकेंद्रीकृत पद्धतीने वितरण आज करण्यात आले. याचठिकाणी मतदान पथकाला मतदान प्रक्रियेविषयी पुन्हा माहिती देण्यात आली व त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पथके मतदान केंद्रांवर रवाना झाली. पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी विभागात 262 मतदान केंद्रे आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289 अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी : नेमानी गोडावून सज्जउद्या मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक साहित्याचे संकलनही विकेंद्रीकृत पद्धतीने होणार आहे. मतदान केंद्रावरील साहित्य सर्वप्रथम जिल्हास्तरावरील सुरक्षा कक्षामध्ये जमा केले जाईल. विभागातील सर्व मतदान केंद्राकडून मतपेट्या जिल्हास्तरावर संकलित झाल्यानंतर त्या मतपेट्या अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा येथील नेमानी गोडावूनच्या सुरक्षा कक्षात (स्ट्राँग रूम) ठेवण्यात येईल. त्यानुसार सर्व सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी करत आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सत्यजित तांबेंना कुणाचं बळ? : पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील निवडणूक लढवत आहेत. सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्याने मविआने जागांची अदलाबदल केली आणि नाशिकची जागा शिवसेनेकडे आली. शिवसेनेने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शुभांगी पाटलांना आता अधिकृतपणे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे.

हेही वाचा : लव्ह जिहादवरुन समाजात विष पेरण्याचे काम - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.