मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (सोमवार) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी राज्यभरात सकाळी ७ वाजण्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र, यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झालेले आहे. गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ५५.८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. राज्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ७८ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये मतदान झाले आहे.
राज्यात काही ठिकाणी या निवडणुकीला पावसाचा फटका देखील बसलेला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याची शक्यता आहे. आता सर्व उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले असून कोण महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसणार? हे मात्र येत्या २४ ऑक्टोबरलाच स्पष्ट होणार आहे.
दिवसभरातील घडामोडी -
- 6.00 सा. - मुंबई : राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५५.८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज
- 5.45 सा. - मुंबई : राज्यात साडेपाचपर्यंत ४६.२१ टक्के
- 5.10 सा. - मुंबई : राज्यात ५ वाजेपर्यंत 44.62 टक्के मतदान झाले आहे.
- 4.20 सा. - मुंबई : राज्यात आतापर्यंत 43.83 टक्के मतदान झाले.
- 3.45 दु. - पुणे - पुण्यामध्ये दोन गटांमध्ये हाणामारी
- 3.15 दु. - मुंबई : राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत 34.37 टक्के मतदान
- 2.40 दु. - गडचिरोली : मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू
- 2.25 दु. - मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोन हीने बजावला मतदानाचा हक्क
- 2.20 दु. - मुंबई : राज्यात 2 वाजेपर्यंत ३०.७५ टक्के मतदान
- 2.04 दु. - लातूर : जळकोट तालुक्याच्या मरसंगवी गावातील बूथ क्र.104 वरील मशीन काम करत नसल्याने मतदान १ वाजतापासून बंद.
- 2.00 दु. - मुंबई : अभिनेता अनिल कपूर आणि हृतिक रोशन यांनी अंधेरी येथे बजावला मतदानाच हक्क
- 1.31 दु. - कोल्हापूर : जिल्ह्यात मतदारांचा भरभरून प्रतिसाद. दुपारी १ वाजेपर्यंत ३३.८२ टक्के मतदान
- 1.28 दु. - पालघर : वाढवण बंदराला विरोध म्हणून वाढवण परिसरातील गावांचा मतदानावर बहिष्कार
- 01.13 दु. - मुंबई : राज्यात 1 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान
- 12.43 दु. - मुंबई : वरळी मतदार संघातील 52 चाळ येथील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद पडल्या.
- 12.35 दु. - वर्धा : जिल्ह्यातील देवळी आणि हिंगणघाट दोन्ही मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड.
- 12.32 दु. - कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती आणि त्यांचे सुपुत्र शहाजीराजे छत्रपती यांनी रांगेत उभारून मतदान केले. शहाजीराजेंनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे.
- 12.30 दु. - मुंबई : सचिन तेंडुलकर यांनी वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
- 12.22 दु. - मुंबई : राज्यात 12 वाजेपर्यंत 16.86 टक्के मतदान
- 12.13 दु. - जळगाव : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यातील हिवरी दिगरवासियांचा मतदानावर बहिष्कार
- 12.07 दु. - मुंबई : काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बिघाडाच्या ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
- 11.46 स. - मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा गीतकार गुलझार यांनी बांद्रा येथे बजावला मतदानाचा हक्क
- 11.44 स. - अमरावती : येरड येथे मशीनमध्ये बिघाड झाल्याने दीड तास मतदान बंद
- 11.42 स. - पुणे : मुळशी पॅटर्न फेम अभिनेता प्रवीण तरडे याने पुण्यात मतदान केले
- 11.39 स. - सोलापूर : अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण.
- 11.32 स. - पुणे : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात कोथरूड मतदारसंघात मतदान केले.
- 11.32 स. - कोल्हापुरात सर्वाधिक 20.28 टक्के, तर दुर्गम भागातील गडचिरोलीत १९.४८ टक्के मतदान आणि नंदुरबारमध्ये 18.77 टक्के मतदान.
- 11.30 स. - मुंबई : राज्यात 11 वाजेपर्यंत 13.13 टक्के मतदान
- 11.24 स. - कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील मळवी गावात कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने मळवी गावाचा मतदानावर बहिष्कार.
- 11.16 स. - मुंबई : राज ठाकरे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
- 11.08 स - पुणे : दोन्ही हात नसतानाही पुण्याच्या सुरेखा खुडे यांनी पर्वती मतदार संघातील भाऊसाहेब हिरे या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
- 11.00 स. - मुंबई : वांद्रे येथील नवजीवन विद्यालय येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
- 10.52 स. - पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 98 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क
- 10.45 स. - नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
- 10.43 स. - मुंबई : मराठी सिनेअभिनेते पुष्कर श्रोत्री, जयंत वाडकर, अशोक लोखंडे यांनी बिंबिसर नगर गोरेगाव येथे बजावला मतदानाच हक्क.
- 10.32 स - हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे ईव्हीएम मशीन बंद पडली.
- 10. 32 स.- मुंबई : राज्यात आतापर्यंत 5.79 टक्के मतदान
- 10.31 स. - कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी शिरोळ येथे बजावला मतदानाचा हक्क
- 10.22 स. - नागपूर : राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सायकल चालवत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला.
- 10.20 स. - मुंबई : अभिनेता आमिर खान यांनी बांद्रा येथे बजावला मतदानाचा हक्क
- 10.15 स - मुंबई : टेनिसपटू महेश भूपती आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री लारा दत्त यांनी बांद्रा येथे मतदानाचा हक्क बजावला.
- 10.13 स. - कोल्हापूर : भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क. महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील. तसेच युतीच्या 235 पेक्षा अधिक जागांवर विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- 10.00 स. - मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
- 9.55 स. - सोलापूर : माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
- 9.50 स. - जळगाव : माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सकाळी साडेनऊ वाजता कोथळीतील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदान केले.
- 9.45 स. - पुणे : खासदार गिरीश बापट यांनी केले सहकुटुंब मतदान केले.
- 9.42 स - सांगली : जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत 3.81 टक्के मतदान होत आहे. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू आहे.
- 9.45 स. - लातूर : रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी लातूर येथे मतदानाचा हक्क बजावला
- 9.40 स. - सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, याठिकाणी राडा झाला असून मदन भोसले व शेखर गोरे यांच्या गाड्यांची तोडफोड केली.
- 9.30 स. - धुळे : जयकुमार रावल यांनी धुळ्यातील दोंडाईचा येथे मतदानाचा हक्क बजावला.
- 9.17 स. - सांगली : इस्लामपूर मतदार संघातील साखराळे येथील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बुथवरील ईव्हीएम मशीन 45 मिनटे बंद पडले.
- 9.16 स. - सांगली : पावसामुळे सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळ भागात उमदी मतदान केंद्रामध्ये पाणी शिरले आहे. तसेच केंद्रासमोर पाणी साचले असल्याने मतदान केंद्र ओस पडले.
- 9.13 स. - ठाणे : अभिनेते उदय सबनीस आणि मुलगी समिहा सबनीस यांनी मतदानाचा हक्क बजालला. समिहा सबनीसने पहिल्यांदाच मतदान केले आहे.
- 9.00 स. - मुंबई : राज्यात आतापर्यंत 5.29 टक्के मतदान
- 8.55 स. - गोंदिया : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा यांनी गोंदिया येथे बजावला मतदानाचा हक्क.
- 8.53 स. - नाशिक : मनमाड येथील रमाबाई नगर भागात पंकज भुजबळ व सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
- 8.02 स. - खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
- 8.30 स. - जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी साडेसात वाजता आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी मतदान केले.
- 8.27 स. - गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदार संघ येथील मतदार केंद्र क्रमांक 9 पिंडकेपार येथे 3 जणांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे.
- 8.26 स. - वरळी : 83 वर्षाच्या आजींनी आपल्या जोडीदारासह बजावला मतदानाचा हक्क. आज त्यांच्या लग्नाचा ५ वा वाढदिवस.
- 8.25 स. - सोलापूर : शहरात जोरदार पाऊस सुरू असून भवानी पेठेतील मतदान केंद्रात पाणी शिरले आहे.
- 8.23 स. - कोल्हापूर : शहरातील जवाहर नगर हायस्कूलमध्ये सकाळी 7 वाजतापासून EVM मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
- 8.11 स. - नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदान केले.
- 8.10 स. - मुंबई : खासदार गोपाळ शेट्टींनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच यंदाही बोरिवलीमध्ये सर्वाधिक मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
- 8.08 स. - अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या चौंडी गावात सहकुटुंब मतदान केले.
- 8.08 स. - अकोला : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व अकोला पूर्वचे भाजप उमेदवार रणधीर सावरकर यांनी सहपरिवार मतदान केले.
- 8.00 स. - मुंबई : अभिनेत्री शुभा खोटे यांनी अंधेरी येथे बजावला मतदानाचा हक्क
- 7.59 स. - मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क
- 7.52 स. - मुंबई : अतुल कुलकर्णी आणि त्याची पत्नी गीतांजली कुलकर्णी यांनी गोरेगावमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
- 7.47 स. - मुंबई : गोरेगाव पूर्व पहाडी शाळेत व्हीव्हीपॅट मशीन बंद
- 7.40 स. - पुणे : अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
- 7.38 स. - मुंबई : माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी पत्नीसह मतदानचा हक्क बजावला
- 7.26 स. - अमरावती : कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या गाडी पेट घेतला. गोळीबार झाल्यामुळे घटना घडल्याची चर्चा
- 7.09 स. - नागपूर : सरसंघचालक मोहन भागवतांनी मतदान केले.