ETV Bharat / state

ठरलं..! पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांवर 'या' दिवशी होणार मतदान - पदवीधर मतदारसंघ बातमी

मागील काही महिन्यांपासून राज्य विधानपरिषदेच्या रिक्त राहिलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 1 डिसेंबरला या जागांसाठी निवडणूक होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 2, 2020, 7:01 PM IST

मुंबई - मागील काही महिन्यांपासून राज्य विधानपरिषदेच्या रिक्त राहिलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात पदवीधरच्या पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदार संघासोबतच पुणे, अमरावती या दोन शिक्षक मतदार संघातील एकुण पाच जागा रिक्त आहेत. या जागांवर 1 डिसेंबरला मतदार होणार आहे. या पाच मतदार संघातील सदस्यांची मुदत ही 19 जुलै, 2020 रोजी संपुष्टात आली होती.

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. मात्र, त्यांनी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून ते विजयी झाल्याने ही पदवीधरची ही जागा रिक्त राहिली होती. तर नागपूरमधून भाजपचे सदस्य अनिल सोले यांचीही 19 जुलैलाच मुदत संपली होती. तर औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतिश चव्हाण तसेच शिक्षक मतदार संघापैकी पुण्यातील अपक्ष सदस्य दत्तात्रय सावंत, अमरावती शिक्षक मतदार संघातील श्रीकांत देशपांडे यांचीही मुदत या दरम्यान संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.

दोन दिवसातच जाहीर होणार निकाल

या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत या पाचही मतदार संघात उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 13 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. तर या पाच मतदार संघात 1 डिसेंबरला मतदान होणार असून दोन दिवसांनी म्हणजेच 3 डिसेंबरला या पाचही जागांचा निकाल जाहीर होणार आहे.

पुण्यात राष्ट्रवादी देणार आव्हान

पुणे पदवीधर मतदार संघात यावेळी राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे पारंपारिक गड बनलेल्या पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले जाणार आहे.

शिक्षक मतदार संघात भाजपमध्ये मतभेद

पुण्यात शिक्षक आणि पदवीधर, अशा दोन जागांवर मतदान होणार असून या ठिकाणी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद समोर आले आहेत. भाजपकडून शिक्षक परिषद या संघपुरस्कृत असलेल्या संघटनेच्या जुन्या सदस्यांना डावलून सोलापूर येथील येथील एका नवख्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. तर तीच गत पदवीधर उमेदवारासाठी जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये याविषयी नाराजी पसरल्याचे परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागपूर पदवीधरमध्ये शिवसेना देणार उमेदवार

नागपूर पदवीधर मतदार संघात मागील अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी येथून माजी सदस्य अनिल सोले यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात असून याठिकाणी शिवसेना मैदानात उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला मदत करणार असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा - राज्यात १०० युनिटपर्यंत मोफत वीजेचा निर्णय लवकरच; मुंबईकरांनाही दिवाळीसाठी खुशखबर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.