ETV Bharat / state

बोटावरील मतदान केल्याची शाई दाखवा आणि निम्म्या किमतीत दाढी करा..

तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकासमोरील रिओ हेअर स्टायलिश या सलूनने ग्राहकांना ५० टक्के सवलत देऊ केली आहे.

रिओ हेअर
author img

By

Published : Apr 27, 2019, 10:45 AM IST

मुंबई - तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकासमोरील रिओ हेअर स्टायलिश या सलूनने ग्राहकांना ५० टक्के सवलत देऊ केली आहे. ही सवलत त्यांनी ८ दिवस दिली आहे. मतदान करुन शाई लावलेले बोट दाखवा आणि ५० टक्के सवलतीच्या दरात केस कापा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

रिओ हेअर स्टायलिश सलून

तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून हे अभियान रिझवान शेख व त्यांची मुलगी मारिया शेख यांनी चालवले आहे. मतदान करणाऱ्या तरुणांना कटिंग, बॉडी मसाज याबरोबरच सलूनमधील सर्व सवलती निम्म्या किमतीत मिळणार आहेत. हे सलून महिला व पुरुष दोघांसाठीही आहे.

मतदानादिवशी सलूनमध्ये गर्दी झाल्यास अपॉइंटमेंटचीही सोय त्यांनी केली आहे. त्याचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहेत. या संधीचा फायदा सर्व मतदारांना केवळ २९ एप्रिल रोजी होणार्‍या मतदानादिवशीच घेता येणार नाही, तर संपूर्ण आठवडाभर होणार आहे. एका आठवड्याच्या कमी कमाईमुळे जर परिवर्तन होणार असेल, मतदान जनजागृती होणार असेल तर इतर दुकानदारही या अभियानात सहभागी होतील, असा विश्वास रिझवान शेख यांनी व्यक्त केला.

Intro:मुंबई मतदानाचा टक्का वाढावा म्हणून एका सलून वाल्यानी;
मतदान केल्याचे दाखवा, 50 % सवलतीच्या दरात सलूनमधील सुविधा घ्या अशी अनोखी जनजागृती केली आहे

तरुण मतदारांना मतदानाबाबत आवाहन करण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानक समोरील प्रसिद्ध रिओ हेअर स्टायलिश रिझवान शेख व त्यांची मुलगी मारिया शेख यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या तरुणासाठी 50 % सवलतीच्या दरात केस,बॉडी मसाज आणि जे काही आपल्या सलून मध्ये केलं जातं ते करणार आहेत. हे सलून महिला व पुरुष दोघांसाठी ही आहे.मतदान करा आणि आपले शाई लावलेले बोट दाखवा आणि 50% सवलतीच्या दरात केस कापा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

मतदानादिवशी सलूनमध्ये गर्दी झाल्यास मतदान करणार्‍या तरुण, तरुणींना तसेच वयोवृद्ध नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बांगडीवाला यांनी मोबाईल माध्यमातून अपॉइंटमेंटचीही सोयह केली आहे. त्यासाठी त्यांनी बँनर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टवर त्यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक लिहिला आहे. याचा प्रचार असे बॅनर लावून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केला आहे.

या संधीचा फायदा सर्व मतदारांना केवळ 29 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानादिवशीच घेता येणार नाही तर संपूर्ण आठवडा भर ही त्यांची सुविधा आहे. एका आठवड्याचा थोड्याशा कमी कमाईमुळे जर देशात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार असेल तर इतर दुकानदारांनीही एक दिवस पोटाला चिमटा काढत या कॅम्पेनमध्ये सामील होण्याचे आवाहनही रिझवान बांगडीवला व मारिया शेख यांनी या वेळी सर्व सलून मालकांना व दुकानदारांना केले आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.