ETV Bharat / state

मुंबईत सोमवारी मतदान, मतदार मात्र कोकणात ! - going

सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, असे असताना मुंबईतील चाकरमानी मतदानाच्या सुट्टीला कोकणाकडे रवाना होत आहेत.

उद्या मुंबईत मतदान, मतदार मात्र कोकणात !
author img

By

Published : Apr 28, 2019, 11:42 PM IST

Updated : Apr 28, 2019, 11:55 PM IST

मुंबई - सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, असे असताना मुंबईतील चाकरमानी मात्र मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने कोकणाकडे रवाना होत आहेत. या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे, यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत. मात्र, मुंबईतील मराठी मतदार मतदानाकडे पाठ फिरवून आप-आपल्या गावी निघाल्याचे चित्र आहे.

मुंबईत सोमवारी मतदान, मतदार मात्र कोकणात !

परळ, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय राहतात. या परिसरातील नागरिक कोकणला जाण्यासाठी खासगी बसने निघाले आहेत. याबाबत काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने केला, त्यावेळी कोणी लग्न कार्यासाठी गावी चालल्याचे सांगतिले. तर कोणी न्यायालयीन कामकाजासाठी गावी जावे लागत असल्याचे सांगितले.

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने पुढाकार घेतला होता. मतदार जनजागृतीवर निवडणूक विभागाने भर दिला होता. मात्र, मतदानाबाबत मुंबईतील मतदार फारसे उत्साही नसल्याचे यावरुन दिसून येत आहे.

Intro:उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. असे असताना मुंबईतील चाकरमानी सलग पाच दिवस सुट्ट्या आल्याने कोकणाकडे रवाना होत आहे.
परळ, दादर परिसरात मोठया प्रमाणात कोकणवासीय राहतात. याच पट्ट्यातील परिसरात ई टीव्ही भारतने आढावा घेतला असता, खासगी बसने मोठया संख्येने नागरिक कोकणाकडे निघाले आहेत. Body:या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. मात्र मुंबईतील मराठी मतदारही मतदानाकडे पाठ फिरवत आपल्या गावी निघालेत. Conclusion:याबाबत काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधीने केला, तेव्हा त्यांना कोणी लग्न कार्यासाठी तर कोणी कोर्ट कचेरीच्या कामासाठी गावी जावे लागत असल्याचे सांगितले. तर पहिल्यांदा मतदानाला हुकावे लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
Last Updated : Apr 28, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.