ETV Bharat / state

विवेक फणसळकर यांच्याकडं DGP पदाचा अतिरिक्त कार्यभार; रश्मी शुक्लांच्या नावाची नुसती हवा - विवेक फणसळकर

Vivek Phansalkar DGP : विवेक फणसळकर पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्राचे डीजीपी म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या विवेक फणसळकर यांची नियुक्ती आहे. रविवारी फणसळकर यांना डीजीपी म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला आहे. पुढील आदेश येईपर्यंत फणसळकर हे डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

Vivek Phansalkar
विवेक फणसळकर
author img

By PTI

Published : Dec 31, 2023, 9:20 PM IST

मुंबई Vivek Phansalkar DGP : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्यावर कथित फोन टॅपिंग प्रकरणी आरोप करण्यात आले होते. (Director General of Police) महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यासंदर्भात चौकशी देखील करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी माहिती दिली होती.

सत्तांतर झाल्यावर रश्मी शुक्ला प्रकरण गुंडाळलं : महाविकास आघाडीनं फोन टॅपिंग प्रकरणी कारवाई सुरू करताच रश्मी शुक्ला यांची प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्या सीआरपीएफमध्ये कार्यरत होत्या. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी बंद झाली होती. यावरुन विरोधकांना भाजपावर आरोप केले होते.

अखेर 'तो' तर्क फोल ठरला : राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस मह संचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. महायुतीमधील अनेकांचा रश्मी शुक्ला यांच्या नावाला विरोध असल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचं म्हटले जात आहे. यामुळं रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पुन्हा लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं सध्या DGP पदाचा तात्पुरता पदभार मुंबई पोलीस आयुक्तांकडे देण्यात आलाय.

रजनीश सेठ यांची कारकीर्द : प्राप्त माहितीनुसार, रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1963 रोजी झाला. रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बीए ऑनर्स (एलएलबी) झालं आहे. ते 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती झाले. विशेष म्हणजे ते फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत. याशिवाय त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. रजनीश सेठ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपद म्हणून देखील काम केलं आहे. तसेच त्यांच्याकडे 2021 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. बाय बाय २०२३! मुंबईतील मरीन ड्राईव्हवरुन पाहा सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त
  2. सनशाईन एंटरप्रायझेस कारखाना आग प्रकरण; मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत
  3. IIT-BHU लैंगिक छळ प्रकरणी तीन जणांना अटक; आरोपी भाजपा कार्यकर्ते असल्याचा अखिलेश यादवांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.